पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (pooja chavan sucide case) पुन्हा एक धक्कादायक खुलासा भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी केला आहे. काही दिवासपूर्वी यवतामळमध्ये पूजा अरुण राठोड या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ती पूजा अरुण राठोड कोण? असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता. आता यवतमाळमध्ये गर्भपात झालेली पूजा राठोड आणि आत्महत्या केलेली पूजा चव्हाण एकच असल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी हा गौप्यस्फोट केला असून, पूजा राठोडचा गर्भपात करणारा डॉक्टर दुसऱ्या दिवसापासून आठ दिवसांच्या रजेवर कसा जातो?, असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, यवतमाळच्या रुग्णालयात ड्युटीवर नसलेला डॉक्टर गर्भपात करतो. दुसऱ्या दिवशी त्याची आई आजारी पडते आणि तो रजेवर जातो, अशा प्रकारचा योगायोग गेल्या २० ते २४ वर्षांच्या सामाजिक जीवनात कधीच बघितला नाही. त्यामुळे, यवतमाळमध्ये ज्या पूजा राठोडचा गर्भपात करण्यात आला आणि पुण्यात आत्महत्या करणारी पूजा चव्हाण ही एकच आहे, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
संजय राठोड यांची चौकशीच नाही, मग अहवाल कुठला पाठवला? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. राज्यात महिला आयोगाला अध्यक्षच नाही, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेतली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, हे बारा व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये आहे, पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या अरुण राठोडच्या मोबाईलवर हा फोन, त्यावेळी संजय राठोड फोनवर होते, असा दावा वाघ यांनी केला.
पूजा चव्हाण ज्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्याठिकाणाची पाहणी झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला. दरम्यान चित्रा वाघ या म्हंटल्या की, तुम्ही मनमानी चालवली आहे. तुम्ही किती लोकांना फसवणार आहेत. नुसत झाकाझाकी करायचे काम सुरु आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळ झोकायाचे काम वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत. आणखी या प्रकरणात एफआयआर देखील झाला नाही. दोन मुलांची प्रत्यक्षदर्शी होती त्यांना यांनी सोडून दिल असं देखील त्या म्हणाल्या. पुढे बोलताना वाघ म्हणाल्या की, पोलिसांवर दबाव आहे. आणि ते ‘वनमंत्री संजय राठोड हत्याराला’ वाचवत आहेत. पोलिसांनी काहीही तपास केलेला नाही. हातावर हात ठेवून बसले आहेत.