पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या गॅलरीतून चित्रा वाघ यांची ऑन द स्पॉट पाहणी

पुणे
अजहर शेख
Updated Feb 25, 2021 | 12:38 IST

chitra wagh visit pooja chavan sucide building : पूजा चव्हाण ज्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्याठिकाणाची पाहणी झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला.

chitra wagh visit pooja chavan sucide building
पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या गॅलरीतून चित्रा वाघ यांची ऑन द स्पॉट पाहणी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ग्रीलची उंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले? याची केली पाहणी
  • ‘संजय राठोड यांना चित्रा वाघ पुन्हा म्हणाल्या हत्यारा’
  • १ वाजता पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार

पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (pooja chavan sucide case) आता आणखी तापायला सुरुवात झाली आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (minister sanjay rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या प्रकरणात संजय राठोड यांचा हात असून, राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात चांगलेच लक्ष घातले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी आज पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली आहे. यावेळी ते चांगल्याच आक्रमक झाल्या असल्याचं पाहायला मिळाल्या.

ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले? याची केली पाहणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी लक्ष घातले असून, त्या आज पूजा चव्हाण ज्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आहे. दरम्यान, पूजा जेथे राहत होती तो फ्लॅट सील करण्यात आला आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? याची सर्व शहानिशा त्या स्वतः करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

‘संजय राठोड यांना चित्रा वाघ पुन्हा म्हणाल्या हत्यारा’

पूजा चव्हाण ज्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्याठिकाणाची पाहणी झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला. दरम्यान चित्रा वाघ या म्हंटल्या की, तुम्ही मनमानी चालवली आहे. तुम्ही किती लोकांना फसवणार आहेत. नुसत झाकाझाकी करायचे काम सुरु आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळ झोकायाचे काम वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत. आणखी या प्रकरणात एफआयआर देखील झाला नाही. दोन मुलांची प्रत्यक्षदर्शी होती त्यांना यांनी सोडून दिल असं देखील त्या म्हणाल्या. पुढे बोलताना वाघ म्हणाल्या की, पोलिसांवर दबाव आहे. आणि ते ‘वनमंत्री संजय राठोड हत्याराला’ वाचवत आहेत. पोलिसांनी काहींही तपास केलेला नाही. हातावर हात ठेवून बसले आहेत.

१ वाजता पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार

दरम्यान पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद आहे. पोलिसांचे म्हणणे असे आहे की, आम्हाला लेखी आदेश आल्याशिवाय आम्ही करणार नाहीत. आता हा लेखी आदेश कोणाचा यायला पाहिजे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ १ वाजता पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी