Maharashtra Assembly Bypoll : पुण्यातून काॅंग्रेसचा उमेदवार ठरला ! पण...

chinchwad and Kasba Peth Bypoll: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे आजारपणाने निधन झाले. त्यामुळे निवडणूक आयोग रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेत आहे.

Congress candidate's name finalized for assembly by-election, NCP is investigating
Maharashtra Assembly Bypoll : पु्ण्यातून काॅंग्रेसचा उमेदवार ठरलं ! पण..  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
  • कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव निश्चित
  • चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू

पुणे :  भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (chinchwad assembly constituency by election 2023) लागली आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार उभे करण्यात येणार असल्याने बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. ( Congress candidate's name finalized for assembly by-election, NCP is investigating)

अधिक वाचा : भर सभेत एकनाथ शिंदेंनी केला 'गौप्यस्फोट' ; तेव्हा तेव्हा शरद पवारांचा फोन येतो...,

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. नुकतेच कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आजारपणाने निधन झाले. त्यामुळे निवडणूक आयोग रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेत आहे.

भाजपकडून तिकीट वाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आपल्या दिवंगत नेत्याच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देते की अन्य कुणाला तिकीट देते याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस या जागेवर निवडणूक लढवत आहे. कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेस लढवणार आहे. उमेदवारांची नावेही निश्चित झाली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवणार आहेत.  महाराष्ट्र काँग्रेसने कसबा पेठ मतदारसंघासाठी पाच नावे निश्चित केली आहेत. कसबा पेठ विधानसभा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. काँग्रेसकडून संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर हे इच्छुक उमेदवार आहेत.

अधिक वाचा : Chandrashekhar Bawankule यांचं Pankaja Munde यांच्याबाबत मोठं विधान

चिंचवडमध्येही पोटनिवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब भोईर, नाना उर्फ विठ्ठल काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप आदी काही जण इच्छुक आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक आयोगाने (ECI) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी आणि नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी