Pune Kasba Peth, Pimpri-Chinchwad By Election Result 2023 : कसब्यात काँग्रेसचा झेंडा, रवींद्र धंगेकर विजयी; बघा प्रत्येक फेरीचा सविस्तर निकाल

पुणे
रोहन जुवेकर
Updated Mar 02, 2023 | 14:19 IST

Congress Ravindra Dhangekar won in Kasba Peth ByElection 2023 : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला.

Congress Ravindra Dhangekar
कसब्यात काँग्रेसचा झेंडा, रवींद्र धंगेकर विजयी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कसब्यात काँग्रेसचा झेंडा, रवींद्र धंगेकर विजयी
  • धंगेकर यांनी 20व्या फेरीअंती 73 हजार 194 मते मिळवली
  • रवींद्र धंगेकर 10 हजार 950 मतांनी विजयी

Congress Ravindra Dhangekar won in Kasba Peth ByElection 2023 : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. धंगेकर यांनी 20व्या फेरीअंती 73 हजार 194 मते मिळवली. रवींद्र धंगेकर 10 हजार 950 मतांनी विजयी झाले. भाजपच्या हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते मिळाली. 

कसबा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात होते. या दुरंगी लढतीत रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडी राखत अखेर विजय मिळवला. 

कसबा पेठ मतदारसंघात मागील 4 दशकांपासून भाजपचे उमेदवार विजयी होत होते. यामुळे यंदाही भाजपचा उमेदवार विजयी होणार की काँग्रेसचा उमेदवार भाजपच्या भरवश्याच्या जागेत मुसंडी मारणार याकडे अनेकांचे लक्ष होते. निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना काही भावनिक मुद्यांवरून सोशल मीडियावरून जोरदार प्रचार झाला. यामुळे काय होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांची संख्या आणखी एका आमदाराने वाढली आहे तर भाजपच्या आमदारांची संख्या एकने कमी झाली आहे.

भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी पराभव स्वीकारुन अपयशाप्रश्नी चिंतन करणार असल्याचे संकेत दिले. चुका सुधारून पुढील निवडणुकीत जनतेला सामोरे जाऊ असे भाजपकडून सांगण्यात आले. दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात कसबा पेठेत विजय मिळाल्यामुळे आनंदाला उधाण आले आहे. कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत विजय साजरा केला.

झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

चाणक्य निती : पत्नी पतीपासून या गोष्टी लपवून ठेवते

घरातल्या झुरळांचा बंदोबस्त करण्याचे सोपे प्रभावी उपाय

  1. कसबा पेठ : मतदारसंघामध्ये 2 लाख 75 हजार 679 पात्र मतदार
  2. रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी झाले मतदान
  3. पोटनिवडणुकीसाठी 50.06 टक्के झाले मतदान
फेरी संख्या रवींद्र धंगेकर, काँग्रेस एकूण मते हेमंत रासने, भाजप एकूण मते
पहिली फेरी 5844 5844 2863 2863
दुसरी फेरी 2751 8595 4095 6958
तिसरी फेरी 2526 11121 3709 10667
चौथी फेरी 4389 15510 3111 13778
पाचवी फेरी 4131 19641 2641 16419
सहावी फेरी 3431 23072 3930 20349
सातवी फेरी 2774 25846 4270 24619
आठवी फेरी 4623 30469 2554 27173
नववी फेरी 4232 34701 3085 30258
दहावी फेरी 3585 38286 3764 34022
अकरावी फेरी 2925 41211 3919 37941
बारावी फेरी  3885 45096 2863 40804
तेरावी फेरी 3482 48578 3233 44037
चौदावी फेरी 3845 52423 3382 47419
पंधरावी फेरी 3666 56089 2944 50363
सोळावी फेरी 4160 60249 2740 53103
सतरावी फेरी 3701 63950 2757 55860
अठरावी फेरी 4139 68089 2789 58649
एकोणिसावी फेरी 4093 72182 2845 61494
विसावी फेरी 1012 73194 750 62244

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी