congress volunteer shot dead | पुण्यात भर दिवसा काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Dec 06, 2021 | 20:02 IST

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर य भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ इथली वाहतूक सुरळीत केली. congress volunteer shot dead in pune

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • पुण्यात भर दिवसा काँग्रेस कार्यकर्त्याचा गोळ्या घालून खून
  • शहरात एकच खळबळ
  • जुन्या वादातून हत्या

पुणे

आज पुण्यात (pune) भर दिवसा एका काँग्रेस (congress) कार्यकर्त्याचा गोळी घालून खून करण्यात आला आहे. समीर शेख (sameer shekh) असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याच्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

congress volunteer shot dead in pune bharati university area

चहा पिण्यासाठी आले होते

पुण्यातील भारती विद्यापीठ (bharati university) पोलीस स्थानकाच्या परिसरात समीर शेख या काँग्रेस कार्यकर्त्याचा खून करण्यात आल आहे. समीर शेख या भागात चहा पिण्यासाठी आले होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्य काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. शेख यांच्यावर हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. त्यात शेख यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर य भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ इथली वाहतूक सुरळीत केली.

नुकतंच जनसंपर्क कार्यालयाचे झाले होते उद्घाटन

समीर शेख हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. तसेच बारामती लोकसभा (baramati constituency) मतदारसंघाचे पदाधिकारी होते. आंबेगाव (ambegaon) भागातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा (purandar Constituency)मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्या हस्ते समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले होते.  तसेच समीर शेख मनूर कन्स्ट्रक्शन(manor construction) नावाने व्यवसायही करत होते.

आर्थिक वादातून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर शेख हे बांधकाम व्यावसायिक होते मनूर कन्स्ट्रक्शन नावाने ते व्यवसाय करत होते. आर्थिक वादावरून एका जुन्या सहकार्‍याने त्यांचा खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे असेही पोलिसांनी यावेळी नमूद केले.

शहरात खळबळ

पोलिसांनी घटनास्थळाहून शेख यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल आहे. शेख यांचा दिवसा ढवळ्या खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी