TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील दोषींना दणका, ७ हजार ८८० उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी

पुणे
भरत जाधव
Updated Aug 04, 2022 | 09:42 IST

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी ७ हजार ८८० उमेदवारांकडून (candidates) प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते. या घोटळ्यातील दोषींना मोठा धक्का बसला असून टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही.

TET Exam Scam; 7 thousand candidates banned from examination forever
टीईटी परीक्षा घोटाळा; ७ हजार उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही.
  • शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल ७८०० विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड
  • शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार

पुणे : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी ७ हजार ८८० उमेदवारांकडून (candidates) प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते. या घोटळ्यातील दोषींना मोठा धक्का बसला आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८८० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांना आता बेकायदेशीर ठरवले आहे.

२०१९ साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल ७८०० विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार ७ हजार ८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Read Also : CWG 2022: ज्युदोमध्ये भारताची हॅटट्रिक तर तुलिकाचा विक्रम

संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.​ तर बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800  विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. 

Read Also : संजय राऊतांना जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी

आरोग्य भरती परीक्षेतील गैरप्रकारांचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत असताना त्या तपासातून टीईटी घोटाळा उघड झाला होता. यात परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक आणि उमेदवारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे 50 ओळखपत्र आढळून आले होते. याच्याकडे टीईटीच्या ते चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली होती. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी झाली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तर सूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर tet च्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली नाही.

Read Also : IND W vs BAR W T20:: भारतीय महिला संघाची सेमीफायनलमध्ये धडक

प्रितीश देशमुख याच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने टीईटी परीक्षेतही घोटाळा झाला का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. तुकाराम सुपे यांना 17 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सायबर पोलिसांनी अटक केली होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी