पुण्यात पैशांवरून भांडण झाल्यानंतर पतीने पत्नीची केला Murder, घराजवळच गाडला मृतदेह

पुणे
विजय तावडे
Updated Oct 12, 2021 | 19:26 IST

Murder: वाखरी गावातील आरोपीच्या घरीच हा प्रसंग घडला आहे. खून केल्यानंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह घराजवळच पुरला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Murder of Wife
पत्नीचा केला खून 
थोडं पण कामाचं
  • पुणे जिल्ह्यातील वाखरीत पैशांवरून भांडण झाल्यानंतर पतीने पत्नीची केली हत्या, घराजवळच गाडला मृतदेह
  • आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की त्याने पत्नी खून केला
  • पैशांवरून भांडण झाल्यानंतर केली हत्या, वाखरी गावातील घटना

पुणे: एका ३० वर्षीय व्यक्तीने भांडणानंतर आपल्या पत्नीचा खून केल्याची  (Husband murdered wife) घटना पुणे जिल्ह्यातील (Pune District)दौंड तालुक्यातील वाखरी गावात (Wakhari Village)घडली आहे. वाखरी गावातील आरोपीच्या घरीच हा प्रसंग घडला आहे. खून केल्यानंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह घराजवळच पुरला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव रमेश वाघमारे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक परिचित व्यक्ती वाघमारेच्या घरी आला, त्यानंतर परिचिताने वाघमारेकडे त्याच्या पत्नीबाबत विचारणा केली. त्यावर धक्कादायकरित्या वाघमारे आपण पत्नीचा खून केल्याची आणि जवळच गाडल्याची माहिती दिली. ( Pune: Husband murdered wife after fight over money, buried the body near house)

आरोपीला अटक आणि मृतदेह हस्तगत

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि महिलेचा मृतदेहदेखील हस्तगत केला आहे. पौलिस चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याच्या पत्नीबरोबर त्याचे पैशांवरून भांडण झाले. त्यानंतर एका क्षणी रागाच्या भरात त्याने पत्नीवर प्रहार करत तिला ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह घराजवळच पुरला. या घटनेने सदर परिसरात धक्का बसला आहे.

पत्नीच्या व्यभिचाराच्या संशयाने खून

आणखी एका घटनेत ४० वर्षीय इसमाने आपल्या ३२ वर्षीय पत्नीचा खून केला आहे. कर्नाटकातील बंगळूरू येथे ही घटना घडली आहे. पत्नीच्या व्यभिचाराचा संशय आल्याने या व्यक्तीने हा खून केला आहे. आरोपीचे नाव बीआर कांथाराजू असे आहे. त्याची पत्नी रुपा हिचे इतर दोन जणांशी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्याच्याच परिचयातील दोन पुरुषांशी त्याचे पत्नीचे अनैतिक संबंध आहेत असा कांथाराजूला संशय होता. त्यामुळे तो पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. कुटुंबाबरोबरच एकदा ट्रिपवर गेले असताना त्याच दोन परिचितांबरोबर पत्नीला नाचताना पाहून कांथाराजूचा संशय आणखी बळावला. ज्या अर्थी आपली पत्नी या दोघांशी इतकी मनमोकळेपणाने वावरते त्याअर्थी तिचे त्यांच्याशी अनैतिक संबंध असावेत या त्याच्या संशयाला यामुळे पुष्टी मिळाली. पत्नीच्या व्यभिचाराचा संताप येऊन त्याचे यावरून या विषयावरून पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. कांथाराजूने आपल्या पत्नीचा भोसकून केला.

घटस्फोट देत नाही म्हणून खूनाचे प्लॅनिंग

आणखी एका घटनेत ३६ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीच्या खूनचा प्लॅन आखला होता. त्याला पत्नीपासून विभक्त व्हायचे होते. मात्र पत्नीने नकार दिल्याने त्याने पत्नीचा खून करण्याचे ठरवले होते. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. कमल सेहगल असे आरोपीचे नाव असून त्याला आपल्या प्रेयसीशी लग्न करायचे होते. मात्र पत्नीने घटस्फोटास नकार दिला. त्यानंतर कमल सेहगलने पत्नीचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने दोन पिस्तूल आणि काडतुडे मिळवली. जवळच्याच अलीगड येथून त्याने हे मिळवले. त्यासाठी त्याने ५०,००० रुपये मोजले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी