Crime News दारू पिताना झाला वाद, मित्रानेचं डोक्यात दगड घालून केला खून

A friend killed a friend in pune ; पुण्यात एका हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दारु पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आहे. सदर घटना ही लोणी काळभोर परिसरात घडली आहे.

A friend killed a friend in pune
मित्रानेचं मित्राच्या डोक्यात दगड घालून केला खून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून
  • मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल
  • पोलिसांनी केली आरोपीला अटक

पुणे : राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न आता राज्यातील जनतेला पडायला सुरुवात झाली आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खुनांसारख्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरम्यान, पुण्यात एका हत्येच्या (Murder) घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दारु पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आहे. सदर घटना ही लोणी काळभोर (loni kalabhor) परिसरात घडली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.

अधिक वाचा ; एक वेळ डोळे दान करता येतील पण विकासाची दृष्टी नाही: गडकरी

मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अख्तर सय्यद (वय ३९, रा. बाजारतळाजवळ, कुंजीरवाडी, ता. हवेली) असं आहे. तर, अख्तर सय्यद या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव अंकुश रामराव कोवे (वय ३०, रा. नागझरी, ता. किनवट, जि. नांदेड) असं आहे. मयत अख्तरच्या पत्नीने अंकुश कोवे याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी जास्मिन सय्यद यांच्या फिर्यादीवरून अंकुशच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी अंकुशला अटक देखील केली आहे.

अधिक वाचा ; India-England semi-final Match: कशी आहे मैदानाची स्थिती 

नेमकी काय घडली घटना?

अख्तर सय्यद आणि अंकुश कोवे या दोघांची जुनी मैत्री असून, दोघेजण मजुरी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे मित्र हे कामावरून परत घरी जात असताना दारू पीत होते. रोजच्यासारखे दोघे जण सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरातील दारूच्या दुकानाशेजारी रात्री दारु पीत होते. यावेळी, दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. सय्यद याच्या डोक्यात कोवेने दगड मारुन मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सय्यदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा ; ATM कार्ड विसरलात? स्मार्टफोनच्या मदतीने काढा एटीएममधून पैसे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी