Pune Crime News: पाळीव कुत्रीवर ६५ वर्षीय वृद्धाकडून अनैसर्गिक अत्याचार, Video समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

पुणे
Updated Aug 28, 2022 | 10:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

65 year old man brutally rapes pet dog : दर वृद्ध व्यक्ती ह कुत्रीवर सतत अत्याचार करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गावातील लोकांनी हा वृद्ध कुत्रीवर अत्याचार करत असताना कॅमेऱ्यात कैद करण्याचे ठरवले. त्यामुसार वृद्धावर पाळत ठेवली गेली. वृद्ध पाळीव कुत्रीवर (pet dog) अत्याचार करतानाचा  घाणेरडा प्रकार अखेर कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

65 year old man brutally rapes pet dog
पाळीव कुत्रीवर ६५ वर्षीय वृद्धाने केले अनैसर्गिक अत्याचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ६५ वर्षीय वृद्धाने कुत्रीवर केला अनैसर्गिक अत्याच्यार
  • खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात घडली घटना
  • १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे: Pune Crime News: एका कुत्रीवर ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. सदर घटनेने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सदर घटना पुणे जिल्ह्यातील खेड (khed) तालुक्यातील टाकळकरवाडी या गावात घडली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर (राहणार, टाकळकरवाडी ता. खेड) असं कुत्रीवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी या वृद्धावर गुन्हा दाखल केला असून या विकृताला अटक देखील करण्यात आली आहे. (crime news old man has been accused of raping female dog in pune)

अधिक वाचा ; कतरिना कैफचे चाहते आहात? या मुलांचा डान्स व्हिडीओ एकदा पाहा

विकृत कृत्य करताना वृद्धाचे काढण्यात आले होते व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वृद्ध व्यक्ती हा कुत्रीवर सतत अत्याचार करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गावातील लोकांनी हा वृद्ध कुत्रीवर अत्याचार करत असताना कॅमेऱ्यात कैद करण्याचे ठरवले. त्यानुसार वृद्धावर पाळत ठेवली गेली. वृद्ध पाळीव कुत्रीवर (pet dog) अत्याचार करतानाचा  घाणेरडा प्रकार अखेर कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळकरवाडी गावात हा प्रकार घडला आहे. ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

अधिक वाचा : सकाळी उठल्याबरोबर या 4 छोट्या गोष्टी...केस आणि त्वचा चमकेल

खायचे अमिष दाखवून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केले

दरम्यान, खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतो. भिवसेन यांचे वय ६५ वर्षे इतके आहे. भिवसेन यांनी अनेकदा पाळीव कुत्रीवर अत्याचार केले असल्याचे उघड झाले आहे. ते राहत्या घरात पाळलेल्या कुत्रीस खायचे आमिष दाखवून बोलावून घ्यायचे आणि तिला घरामध्ये नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे. भिवसेन करत असलेले कृत्य हे शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. ज्येष्ठ नागरिकाने असे कृत्य केल्यामुळे सगळेच हैराण झाले होते. त्यामुळे या तरुणांनी याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील वृद्ध भिवसेन यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक देखील केली आहे.

अधिक वाचा : कोरेगावमध्ये भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

१९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

पोलिसांनी आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे. मात्र, ६५ वर्षीय वृद्धाने केलेल्या या कृत्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी