Crime News : बावीस वर्षीय विवाहितेवर दोन सख्या भावांकडून अत्याचार, पतीला कळू नये म्हणून केलं ब्लॅकमेल

पुणे
Updated Nov 20, 2021 | 12:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका बावीस वर्षीय विवाहितेवर दोन सख्या भावंडांनी अत्याचार केला. पिडीत महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत संबंधितांनी वेळोवेळी अत्याचार केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News: Twenty-two-year-old married woman tortured by two brothers, blackmailed to keep husband unaware
Crime News : बावीस वर्षीय विवाहितेवर दोन सख्या भावांकडून अत्याचार, पतीला कळू नये म्हणून केलं ब्लॅकमेल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दोन सख्या भावंडांनी बावीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार केला
  • मुलाला जीवे मारण्याची धमकी देत संबंधितांनी वेळोवेळी अत्याचार
  • दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

सातारा : एका बावीस वर्षीय विवाहितेवर माहेर गावातील दोन सख्या भावंडांनी अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पती किंवा सासरच्या कोणताही काही सांगितले तर तुझ्या मुलांला मारुन टाकेन, अशी धमकी देत संबंधितांनी वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Crime News: Twenty-two-year-old married woman tortured by two brothers, blackmailed to keep husband unaware)

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका गावात २०१९ मध्ये पीडित विवाहितेचा २१ वर्षेीय युवक वारंवार पाठलाग करत होता. मोबाईलवर काॅल करुन 'माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला खूप आवडतेस, असं तो विवाहितेला म्हणत होता. यावेळी पीडितेने माझे लग्न झाले असून, मला एक मुलगाही आहे. तु मला परत फोन करू नको, असे सांगितले. मात्र, तो नेहमी फोन करू लागला. त्यामुळे विवाहितेने त्याचा फोन ब्लाॅक केला. दरम्यान एके दिवशी पीडित महिला शेतात जात असताना संबंधित २१ वर्षाच्या युवकाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी नेहून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतरही तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केला.

त्याचवेळी ही बाब अत्याचार करणाऱ्या युवकाच्या २० वर्षाच्या धाकट्या भावाला कळाली. आणि त्या धाकट्या भावानेही  पीडितेला वारंवार काॅल करण्यास सुरुवात केली. मी तुझ्यावर प्रेम करणार म्हणजे करणार. तु जरी नाही म्हणालीस तरी मी तुझ्यावर प्रेम करणार असे तो फोनवर पीडितेला बोलत होता. मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पीडितेला तो काॅल करण्यास भाग पाडत होता. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री दहा वाजता पीडितेच्या घराच्या पाठीमागील पडक्या घरात या धाकट्या भावानेही पीडित विवाहितेवर अत्याचार केला.

अखेर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने पिडीत विवाहितेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर दहिवड पोलीस ठाण्यात त्या दोघा भावांच्या विरोधात तक्रार दिली आहे. दहिवडी पोलीस दोन्ही युवकांचा शोध घेत असून, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. नीलेश देशमुख हे अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी