NCP: 'फडणवीस सतत अपमान करतात, मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे भाजपचं षडयंत्र सुरु', सुप्रिया सुळेंचा आरोप

पुणे
रोहित गोळे
Updated Jul 15, 2022 | 18:42 IST

Supriya Sule Alleges on BJP: देवेंद्र फडणवीस हे सारखा मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. त्यांच्या मागे काही तरी षडयंत्र सुरु आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

devendra fadnavis constantly insulting cm shinde bjp conspiracy is behind cm supriya sule alleges
फडणवीस सतत अपमान करतात मुख्यमंत्र्यांचा: सुप्रिया सुळे  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंचा सारखा अपमान करत असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप
  • भाजप मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी षडयंत्र रचत असल्याचाही सुप्रिया सुळेंनी केला आरोप
  • सुप्रिया सुळेंची भाजपवर जोरदार टीका

पुणे: 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पाठीमागे काही तरी मोठं षडयंत्र चाललंय, बिचारे मुख्यमंत्री असे कमकुवत दिसावे आणि लोकांच्या नजरेतून उतरावे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रयत्न करत आहे. मला वाटतंय काही तरी या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मोठं षडयंत्र भाजप (BJP) करतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रचंड काळजी वाटते आहे.' अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. त्या पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी असाही आरोप केला की, 'उपमुख्यमंत्री हे सातत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत.' 

पाहा सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या: 

मुख्यमंत्र्यांचा सारखा अपमान सुरु आहे!

'जे नवीन आलेलं सरकार आहे ते खूप गोंधळलेलं सरकार आहे. एक तर मुख्यमंत्र्यांचा सातत्याने मार्गदर्शक असतो. खरं तो आपल्या मुख्यमंत्र्यांचा तो अपमान आहे. आज सकाळीच इथे येण्याआधी टीव्हीवर पाहिलं की, चार गोष्टी दाखवल्या की, जिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉमटिंग होताना दिसंतय. हे महाराष्ट्राला शोभणारं नाहीए. कारण की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान.' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

अधिक वाचा: 'फडणवीस,शिंदेंसारखी ढोंगी लोकं नाहीत', राऊतांची घणाघाती टीका

'मुख्यमंत्र्यांचा रोज अपमान, आता कुठे गेला आमदारांचा स्वाभिमान?'

'मला अजून आठवतं अनेक आमदार म्हणत होते की, दादांनी फंड दिला नाही. म्हणून आम्ही स्वाभिमानाने या सरकारमधून बाहेर पडलो आहोत. मला त्या आमदारांना विचारायचं आहे की, आता तुमचा स्वाभिमान गेला कुठे? मुख्यमंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो. तो राज्याचा मुख्यमंत्री असतो.' 

'त्यामुळे माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जर सातत्याने कोणी अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान हा जागा आहे आणि जागा राहील. दिल्लीच्या समोर हा महाराष्ट्र कधी झुकलेला नाही आणि झुकू देणार नाही. हे सातत्याने टीव्हीवर दिसतंय तरी यांना कशा वेदना होत नाही. यांना छत्रपतीचं नाव घेण्याचा आजनंतर अधिकारच नाही. कारण की ते आज सारखे आमच्या मुख्यमंत्र्यांचे काही तरी चुका काढतायेत.' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी बंडखोर आमदारांना चुचकारलं आहे. 

अधिक वाचा: महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री कोण... शिंदे की फडणवीस?

'मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मोठं षडयंत्र भाजप करतंय'

'मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नाहीत की, मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे काही तरी मोठं षडयंत्र चाललंय की, बिचारे मुख्यमंत्री असे कमकुवत दिसावे आणि लोकांच्या नजरेतून उतरावे. काही तरी या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मोठं षडयंत्र भाजप करतंय. असा माझा आरोप आहे. हे कृतीमधून दिसतंय. त्यामुळे मला शिंदे साहेबांची प्रचंड काळजी वाटतेय.' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत.  

'मला मुख्यमंत्र्यांची प्रचंड काळजी वाटते' 

'शिंदे हे महाविकास आघाडीत असताना त्यांनी ज्या निर्णयांना होकार दिला होता ते निर्णयच आता बदलले जात आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा माजं मत आहे की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काही तरी षडयंत्र चाललं आहे. मला मुख्यमंत्र्यांची प्रचंड काळजी वाटतेय.'

अधिक वाचा: गुरुपौर्णिमेच्या दिवशी CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

'कारण अशा तीन-चार गोष्टी पहिल्याच चार दिवसात झालेल्या आहेत की, उपमुख्यमंत्री हे सातत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान मी कधीच सहन करणार नाही.' 

'तुम्ही आता विचार करा. एखादा एवढा मोठा नेता जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसतो. त्याला मुद्दामून प्रॉमटिंग करणे, त्यांना चिठ्ठ्या पाठवणे. यातून सातत्याने आपल्या मुख्यमंत्र्यांना काही तरी कमी दाखवण्याचा प्रयत्न हा उपमुख्यमंत्री करत आहेत.' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी