"दिपाली चव्हाणच्या मृत्यूसाठी जबाबदार असेल त्याला कडक शासन केले जाईल"

पुणे
अजहर शेख
Updated Mar 27, 2021 | 15:56 IST

dipali chavan sucide case : दीपाली यांना त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा आहे. दीपाली या गर्भवती होत्या

dipali chavan sucide case
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा
  • दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची घेतली होती ठाम भूमिका
  • शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली

इंदापूर: अमरावती जिल्ह्यातून (amaravati district) महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शासन केले जाईल, असे वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू जे जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर ती निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. दीपाली चव्हाण यांचा मृत्यू हा धक्कादायक आणि दुःखदायक आहे. ते शनिवारी इंदापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत १२८ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली

दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या  RFO दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रेंजर असोसिएशन व शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची घेतली होती ठाम भूमिका

दीपाली चव्हाण यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी दोषी असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत या दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची आणि वनपाल-वनरक्षक संघटनेची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून दीपाली यांना त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा आहे. दीपाली या गर्भवती होत्या, त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. आज सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी उघड होताच परिसरात खळबळ उडाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी