मांत्रिकाच्या सांगण्यावरून पुजेदरम्यान पतीने पत्नीला सर्वांसमोर नग्न होऊन करायला लावली अंघोळ

During the puja, the husband forced his wife to take a bath naked : फिर्यादी महिलेच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी यासाठी महिलेला अघोरी कृत्य करायला लावले आहे. आपल्या पत्नीसोबत अघोरी पुजा केली. तसेच या पुजेदरम्यान, तिला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

During the puja, the husband forced his wife to take a bath naked
पुजेदरम्यान महिलेला सर्वांसमोर नग्न होऊन करायला लावली अंघोळ 
थोडं पण कामाचं
  • मांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाने आपल्या पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली
  • पुजेदरम्यान महिलेला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली
  • फिर्यादी महिलेने पतीसह सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे

पुणे : पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाने आपल्या पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

अधिक वाचा : अमित शाह भेटले ज्युनियर एनटीआरला, ट्विट करत केलं कौतुक

फिर्यादी महिलेने पतीसह सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेचा पती , सासरा आणि सासू यांचा समावेश आहे. या तिघांनी फिर्यादी महिलेवर अत्याचार केले. तसेच या सासरच्यांकडून वेळोवेळी फिर्यादीचे शारीरिक आणि मानसिक शोषण देखील करण्यात आल्याचं फिर्यादी महिलेने म्हटलं आहे. ज्या मांत्रिकाने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, त्याच्यावरही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. त्याचबरोबर, सासरच्या लोकांनी फिर्यादी महिलेला वेळोवेळी मारहाण करून तिच्याकडून तब्बल १ ते २ कोटींची रक्कम उकळल्याची देखील धक्कादायक माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा ; धनश्रीला घरात वावरणही का झालं कठीण; जाणून घ्या काय आहे कारण

पुजेदरम्यान महिलेला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी यासाठी महिलेला अघोरी कृत्य करायला लावले आहे. आपल्या पत्नीसोबत अघोरी पुजा केली. तसेच या पुजेदरम्यान, तिला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एवढच नाही तर आरोपींनी फिर्यादीला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेवली आणि त्यावर बनावट स्वाक्षरी करून ७५ लाखांचे कर्ज काढले असल्याचीही माहिती महिलेने पोलिसांना सांगितली आहे.

अधिक वाचा ; वजन कमी करण्यासाठी Best पर्याय 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदा 

एकूण ४ जणांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

सदर घटनेप्रकरणी पिडीत महिलेने आपल्याला न्याय मिळावा यासाठी थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठले. आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी  पती, सासरा आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांत्रिकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी