पिंपरी चिंचवडमध्ये ED ची मोठी कारवाई; धाड चालू असतानाच बँकेच्या माजी अध्यक्षाने नष्ट केला पुरावा

पुणे
भरत जाधव
Updated Jan 29, 2023 | 11:20 IST

दि. सेवा विकास बँकेचा (the seva development Bank) माजी अध्यक्ष (ex-chairman) अमर मुलचांदणीसह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे. बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी ईडीने आज पिंपरी चिंचवडमध्ये छापा टाकला.

 ED raid in Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडमध्ये ED ची मोठी कारवाई   |  फोटो सौजन्य: Times Now

पिंपरी चिंचवड  : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ईडीने एका बँकेच्या माजी अध्यक्षाच्या घरावर मोठी कारवाई केली आहे. दि. सेवा विकास बँकेचा (the seva development Bank) माजी अध्यक्ष (ex-chairman) अमर मुलचांदणीसह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे. बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी ईडीने आज पिंपरी चिंचवडमध्ये छापा टाकला.  ईडीची छापेमारी सुरू असतांना घरातच लपून बसलेल्या अमर मुलचंदाणी याने मोबाईल मधील बेहिशेबी कर्ज प्रकरणाशी संबधित डेटा डिलीट करून पुरावे नष्ट केले. (ED raid in Pimpri Chinchwad;  ex-chairman of bank destroyed  evidence while the raid)

अधिक वाचा  : FTII, टिसमध्येही इंडिया : द मोदी क्वेश्चन'चं सादरीकरण

अमर मुलचंदाणीला लपवून ठेवण्यासाठी तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबीयांनी मदत केली. या प्रकरणी EDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री उशीरा मुलचंदाणीची पत्नी आणि 3 भावांसह एका कामगाराला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमरमूल चंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले. तेव्हा त्यांच्या तपासात अमरमूल चंदानीच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही, उलट पुरावा नष्ट केला.

अधिक वाचा  : वीज ग्राहकांना महावितरणाकडून दरवाढीचा करंट

तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी अमरमूल चंदानीच्या दोन्ही भावाला आणि भावाच्या एका मुलाला अटक केली आहे.   आणखी दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले. अशोक साधुराम मूलचंदानी (वय- 57वर्ष ), मनोहर साधुराम मूलचंदानी (वय- 61) सागर मनोहर मूलचंदानी वय- 26 , अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

काय आहे प्रकरण?

अमरमूल चंदानी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन आहेत. पिंपरीतमधील  मिस्त्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचे वाटप केल्याचे आणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आले होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि आज ईडीने छापा टाकला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी