Eknath Shinde weight lost : राज्याचे प्रश्न सोडा आधी मुख्यमंत्र्यांच्या वजनाची चिंता करा; सततच्या धावपळीमुळे शिंदे साहेबांचं घटलंय वजन

पुणे
भरत जाधव
Updated Feb 13, 2023 | 12:55 IST

Cm Shinde worried for weight loss : राज्यातील जनतेची काय प्रश्न ते असतील राहू द्या. त्या समस्या नंतर सोडवू आधी मुख्यमंत्री (Chief Minister) आपलं वजन कसं वाढवतील याची चिंता नागरिकांना करावी लागणार आहे.  कारण भाजप नेते गिरीश बापट ( Girish Bapat) यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी त्यांच्यासमोर वजन (weight) घटल्याची चिंता व्यक्त केली.  

Chief Minister's Worry for his weight loss
अरे देवा ! सततच्या धावपळीमुळे CM शिंदे साहेबांचं घटलं वजन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभरात दौरे करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
  • धावपळीमुळे एकनाथ शिंदे यांचे 10 किलोने कमी झाले.
  • शनिवारी शिंदे यांनी पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी भेट घेतली.

Cm Shinde worried for weight loss : पुणे:  राज्यातील जनतेची काय प्रश्न ते असतील राहू द्या. त्या समस्या नंतर सोडवू आधी मुख्यमंत्री (Chief Minister) आपलं वजन कसं वाढवतील याची चिंता नागरिकांना करावी लागणार आहे.  कारण भाजप नेते गिरीश बापट ( Girish Bapat) यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी त्यांच्यासमोर वजन (weight) घटल्याची चिंता व्यक्त केली.  (Chief Minister's Worry for weight loss before state issues)

अधिक वाचा  : Happy Kiss Day Shayari: शायरी करत करा प्रपोज;लाजत देईल होकार

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभरात दौरे करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.  शिंदे हे  पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी बापट यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान त्यांनी वजन घटल्याची चिंता व्यक्त केली.

अधिक वाचा  :  तुमच्या प्रेमाला या सुंदर वॉलपेपरसह पाठवा खास massage

या सगळ्या धावपळीमुळे आपले वजन जवळपास 10 किलोने कमी झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शनिवारी शिंदे यांनी पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बराचवेळ गप्पा मारल्या. या गप्पांच्या ओघात एकनाथ शिंदे यांनी सततची धावपळ आणि ओढाताण यामुळे आपले वजन घटल्याचे बापट यांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

धावपळीमुळे घटलं वजन 

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावत सुरुवातील सूरत, त्यानंतर गुवाहाटीत आपल्या समर्थक आमदारांसह बरेच दिवस मुक्काम ठोकला होता. राज्यात येऊन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही एकनाथ शिंदे हे स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील जवळपास सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. या माध्यमातून शिंदे गटाची ताकद वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. परंतु, या सगळ्या धावपळीत एकनाथ शिंदे यांची प्रचंड दमछाक होत असल्याचे आता समोर आले आहे. 

अधिक वाचा  : पुणेकर रॅपर एमसी स्टॅन ठरला 'Bigg Boss 16'चा विजेता

 मोदी आणि शाह यांचे एजंट झाल्यानं घटलं वजन 

एकनाथ शिंदे यांनी आपले वजन घटल्याचे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे शिवसेनेत होते तेव्हा त्यांना कोणतही टेन्शन नव्हतं. त्यामुळे त्यांचे वजन वाढत होते. आता एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे एजंट झाले आहेत. मोदी-शाह यांच्या टेन्शनमुळेच एकनाथ शिंदे यांचे वजन कमी झाल्याची खोचक टिप्पणी नाना पटोले यांनी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी