Ekvira Chitri Yatra 2022: एकवीरा आईचे दर्शन यंदा चैत्र पालखी सोहळ्याला खुले, पण कलम १४४ लागू

Ekvira Chitri Yatra 2022 तब्बल दोन वर्षांनंतर कार्ला येथील एकवीरा गडावर एकवीरा देवीची चैत्र पालखी सोहळा होणार आहे. ८ तारखेला असणाऱ्या या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे.

ekvira chitri yatra 2022 pune District administration implemented section 144 but devotees allow for mata darshan
एकवीरा गडावर कलम १४४ लागू पण भाविकांना बंदी नाही 
थोडं पण कामाचं
  •  तब्बल दोन वर्षांनंतर कार्ला येथील एकवीरा गडावर एकवीरा देवीची चैत्र पालखी सोहळा होणार आहे.
  • तारखेला असणाऱ्या या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या या एकवीरा देवीच्या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम १४४ लावण्यात आले

कार्ला :  तब्बल दोन वर्षांनंतर कार्ला येथील एकवीरा गडावर एकवीरा देवीची चैत्र पालखी सोहळा होणार आहे. ८ तारखेला असणाऱ्या या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या या एकवीरा देवीच्या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम १४४ लावण्यात आले आहे. पण तरीही भक्तांना आपल्या आईचे दर्शन घेता येणार आहे. (ekvira chitri yatra 2022 pune District adminstration implemented section 144 but devotees allow for mata darshan)

चैत्र नवरात्र (Chaitra Navaratr) दरम्यान एकवीरा गडावर 7-10 एप्रिल दरम्यान चैत्री यात्रा (Chaitri Yatra) आयोजित करण्यात आली आहे.   या वर्षी महाराष्ट्र सरकारने कोविड संदर्भातील नियम शिथील केले आणि यात्रा आणि जत्रांना परवानगी देली आहे. आहे. पण या यात्रेदरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे जिल्हाधिकार्‍यांनी कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू केली आहे. या जमावाबंदीच्या आदेशामुळे भाविकांना एकवीरा आईचं दर्शन होणार की नाही याबाबत शंका होती पण १४४ कलम लागले असले तरी भाविकांना प्रवेशबंदी नसेल.

कोळी,आगरी बांधवांसाठी ही चैत्री यात्रा महत्त्वाची असते. या यात्रेदरम्यान गडावर यंदा दारुबंदी आणि पशुहत्या करण्यास बंदी असणार आहे. यात्रेचं औचित्य साधत अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी, नवस फेडण्यासाठी येतात. हजारो पालख्या, दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कार्ल्याला पायी आणल्या जातात . देवीच्या पालखी सोहळ्यास लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते.

पुणे जिल्हा प्रशासनाने जारी केलेली नियमावली

  1. यात्रेदरम्यान शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके फोडणे निषिद्ध असेल. 
  2. एकाच प्रकारचे, रंगाचे कपडे घालून गोंधळ घालणे, 
  3. शिवीगाळ करणे, अर्वाच्च भाषेत बोलणे, 
  4. एकमेकांत अथवा ग्रुपमध्ये भांडणे करणे टाळा. 
  5. कार्ला लेणी आणि  परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि शिल्पांना हानी पोहचविणे किंवा विद्रुपीकरण करणे टाळा.
  6. एकविरेच्या यात्रा काळात वेहेरगाव, कार्ला, मळवली, वाकसई, वरसोली, देवघर आदी परिसरात दारुविक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी