सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना, घरगुती वादाचे पडसाद, भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकले

पुणे
रोहन जुवेकर
Updated Aug 06, 2022 | 16:12 IST

Satara : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वाद विकोपाला गेला.  धाकट्या भावाने कुटुंबात झालेल्या भांडणाचा राग म्हणून थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकले. 

Elder Brother 10 Month Old Baby Was Thrown Into Well After A Family Dispute In Satara
भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना
  • घरगुती वादाचे पडसाद
  • भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकले

Satara : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वाद विकोपाला गेला.  धाकट्या भावाने कुटुंबात झालेल्या भांडणाचा राग म्हणून थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकले. 

याआधी धाकट्या भावाने पुतण्याला दुकानात घेऊन जातो, असं सांगून सातारा-रहिमतपूर रस्त्यावर दहा महिन्यांच्या बाळाला नेले. नंतर बाळाला रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले. धक्कादायक म्हणजे धाकट्या भावाने मोठ्या भावाला फोन केला. यानंतर त्याने स्वतःच्या कृत्याची जाहीर कबुली दिली.

माहिती देऊन धाकटा भाऊ पसार झाला. माहिती मिळताच घाबरलेल्या थोरल्या भावाने आधी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस येण्याआधीच धाकटा भाऊ १० महिन्यांच्या पुतण्याला विहिरीत फेकून पसार झाला होता. पोलीस बाळाला विहिरीमध्ये फेकणाऱ्याचा शोध घेत आहेत. 

मुलाचा मृत्यू

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. दहा महिन्यांच्या चिमुरड्याला विहिरीत फेकणारा फरार आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी