महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर राजू शेट्टी यांनी दिली पहिल्यांदाचं प्रतिक्रिया, म्हणाले....

ex mp raju shetti on bharatiya janata parti : घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथामाजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली

ex mp raju shetti on bharatiya janata parti
राजकीय घडामोडींवर शेट्टी यांनी दिली पहिल्यांदाचं प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ३ दिवसांपासून घडत असलेल्या घडांमोडीवर राजू शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया
  • देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव – राजू शेट्टी
  • महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही - शेट्टी

पुणे : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत काही ४० आमदारांना घेऊन गुवाहटी येथे एका गेले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार धोक्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथामाजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. . भाजपकडं असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी असा आरोपी करत भाजपवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा : एवढं धैर्य येतं कुठून? ED अधिकाऱ्याचा राहुल गांधींना सवाल

देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव – राजू शेट्टी

दरम्यान, पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात. ही प्रवृत्ती वेगानं वाढत आहे. देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. एखादा पक्ष किंवा संघटना उभा करण्यासाठी किती कष्ट करावे लागते हे ज्याचं त्यालाच माहित आहे. अशा पद्धतीनं एखाद्या पक्षाची वाताहत होतेय त्यामुळं वाईट वाटत असल्याचे शेट्टी म्हणाले.  भाजप ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा  अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही,  तेव्हा काळाची पावले ओळखा असंही शेट्टी म्हणाले.

अधिक वाचा : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले...  

महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही

महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं असल्याचे देखील शेट्टी म्हणाले. दरम्यान, शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं की, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. या सर्वामागे भाजप असल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा ; जुलैच्या सुरूवातीला बुध बदलणार चाल, या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी