भीषण अपघात: पिकअपची दोन दुचाकींना धडक; 5 जण ठार, 3 गंभीर जखमी

पुणे
भरत जाधव
Updated Mar 28, 2023 | 08:52 IST

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींना धडक देत 8 जणांना चिरडले. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात नेण्याआधी मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी आहेत.

Fatal accident: Pickup collides with two-wheelers; 5 killed, 3 seriously injured
भीषण अपघात: पिकअपची दोन दुचाकींना धडक; 5 ठार, 3 गंभीर जखमी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे पिकअपने दोन दुचाकीसह आठ जणांना चिरडले.
  • मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश
  • अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींना धडक देत 8 जणांना चिरडले. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात नेण्याआधी मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी आहेत.

अधिक वाचा  : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे  पिकअपने दोन दुचाकीसह आठ जणांना चिरडले. तीनही वाहने समोरासमोर धडकली. या अपघातात एका लहान मुलाचा आणि व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सहा जणांपैकी आणखी तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

अधिक वाचा  :हे शाकाहारी पदार्थ केसांना बनवतात मजबूत

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघांवर  उपचार सुरु असून पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातग्रस्तांना स्थानिकांनी मदत करत रुग्णालयात पोहोचवले. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून आळेफाटा पोलिस पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी