अखेर पिंपरीच्या महापौरांच्या मुलावर गुन्हा दाखल

पुणे
अजहर शेख
Updated Feb 25, 2021 | 16:34 IST

Filed a case against the mayor usha dhore son: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिस अँड मिसेस फॅशन शो हा कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आला होता.

Filed a case against the mayor usha dhore son
अखेर पिंपरीच्या महापौरांच्या मुलावर गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपच्या नगरसेविकेनेही हजेरी लावली.
  • महापौरांसह बहुतांश नगरसेविकांनी विनामास्क केलं रॅम्पवॉक
  • भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस अँड मिसेस फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.

पिंपरी चिंचवड : कोरोना (corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यादरम्यान, अनेक लग्न समारंभ, कार्यक्रम होत असून, यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. दरम्यान, फॅशन शोमध्ये कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता महापौर माई उर्फ उषा ढोरे (usha dhore) यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल (fir filed) करण्यात आला आहे. जवाहर मनोहर ढोरे (jawahar dhore) यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जवाहर ढोरेंविरोधात गुन्हा

सदर प्रकरणी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांचा मुलगा जवाहर मनोहर ढोरे यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहर मनोहर ढोरे यांच्याविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस अँड मिसेस फॅशन शो 

दरम्यान, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिस अँड मिसेस फॅशन शो हा कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आला होता. दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामध्ये कोरोनासंबंधी सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलं असल्याचे पाहायला मिळाले होते.

महापौरांसह बहुतांश नगरसेविकांनी विनामास्क केलं रॅम्पवॉक

आमदार महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या अनेक प्रेक्षकांनी तोंडाला मास्क देखील लावला नसल्याचे पाहायला मिळाले. वेळी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. दरम्यान, कार्यक्रमावेळी महापौरांसह बहुतांश नगरसेविकांनी विनामास्क रॅम्पवॉक देखील केलं. तसेच या या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेही उपस्थित होत्या.

पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपच्या नगरसेविकेची हजेरी

दरम्यान, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस अँड मिसेस फॅशन शो च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला अनेकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर सदर कार्यक्रमात पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपच्या नगरसेविकेनेही हजेरी लावली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचा पाहायला मिळाला.

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती

सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, सभागृहाच्या फक्त पन्नास टक्के उपस्थिती ठेवणं अनिवार्य होतं. परंतु आमदार महोदयांचा कार्यक्रम म्हणजे राडा तर होणारच! आणि प्रत्यक्षात तस झालंही, कार्यक्रमाला संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून आलं. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहे. मात्र महापौर आणि नगरसेवकांकडूनच नियमांची पायमल्ली केली जात आहे. याला आळा जर नाही घातला तर पूर्वीसारखी परस्थिती पुन्हा उद्भवू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी