अखेर पुण्यातील 'या' बड्या नेत्याने केला मनसेला रामराम

पुणे
Updated Jun 06, 2022 | 19:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Finally, a big leader from Pune left the Maharashtra Navnirman Sena party : निलेश माझीरे (Nilesh Mazire) यांनी मनसेचा राजीनामा देण्याआगोदर एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाला राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. पुणे मनसेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मनसेचे फायरब्रान्ड नेता म्हणून ओळख असलेले वसंत मोरे हे देखील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

Finally, a big leader from Pune left the Maharashtra Navnirman Sena party
अखेर पुण्यातील 'या' बड्या नेत्याने केला मनसेला रामराम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेचा  राजीमाना दिला
  • मी स्वतःला समजूत घालू शकतो, कार्यकर्त्यांना किती समजून सांगणार – माझिरे यांची फेसबुक पोस्ट
  • पुणे मनसेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

पुणे : माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे (Nilesh Mazire) यांनी मनसेचा  राजीमाना दिला आहे. निलेश माझीरे यांनी मनसे सोडल्याने पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे. कारण निलेश माझीरे हे मनसेचे सक्रीय नेते होते. त्याचबरोबर ते मनसेचे दिग्गज नेते वसंत मोरे यांचे खंदे समर्थक देखील होते. निलेश माझीरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. माजीरे यांच्या राजीनाम्याने मनसेत खळबळ उडाली असून, पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे.

अधिक वाचा : जीवनात या गोष्टींची लाज बाळगली तर आयुष्यभर होईल पश्चात्ताप

पुणे मनसेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

निलेश माझीरे (Nilesh Mazire) यांनी मनसेचा राजीनामा देण्याअगोदर एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाला राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. पुणे मनसेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मनसेचे फायरब्रान्ड नेता म्हणून ओळख असलेले वसंत मोरे हे देखील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र,  राज ठाकरे यांनी वसंत मोरेंची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली होती, पण आता मोरे यांच्या खंद्या शिलेदाराने पक्षाला राजीनामा दिल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

अधिक वाचा ; जवान विपुल इंगवले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर

मी स्वतःला समजूत घालू शकतो, कार्यकर्त्यांना किती समजून सांगणार – माझिरे यांची फेसबुक पोस्ट

निलेश माझिरे यांनी फेसबुकवरती पोस्ट करत म्हटलं आहे की, 'आता वेळ आली कोणता तरी चांगला निर्णय घेण्याची, आज माझ्या कार्यकर्त्यांशी सर्वांची व्यवस्थित बोलणे झाले. मी स्वतःला समजूत घालू शकतो, कार्यकर्त्यांना किती समजून सांगणार. माझ्या बाबतीत जे काय चालय, ते मी दोनच दिवसांत फेसबुक लाइव्ह येऊन नावा सहीत जाहीर करणार आहे, जय, महाराष्ट्र, अशी पोस्ट माझिरे यांनी केली आहे.

अधिक वाचा ; बंगाल, MP, UP आणि मुंबईसह इतर ८ संघावर सर्वांच्या नजरा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र ७.३० लाइव्ह येत आहे तयार रहा – माझिरे

'आता वेळ आली कोणता तरी चांगला निर्णय घेण्याची, अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र ७.३० वाजता लाइव्ह येत आहे तयार रहा, अस या पोस्टमध्ये म्हटले आहे. निलेश माझीरे यांनी आज दुसरी फेसबुक (Facebook) पोस्ट केली. यात आता वेळ आली आहे चांगला निर्णय घेण्याची अस म्हटले आहे. काही दिवसापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात सभा झाली. या दिवशीही पुणे मनसेत नाराज नाट्य सुरू झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी