अखेर गोपीचंद पडळकरांवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे
अजहर शेख
Updated Mar 12, 2021 | 12:17 IST

case was filed against Gopichand Padalkar in Pune: हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं होत, या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी एन्ट्री घेतली होती. त्यांच्या विध्यार्थ्याच्या आंदोलनाला धार आली

Finally, a case was filed against Gopichand Padalkar in Pune
अखेर, गोपीचंद पडळकरांवर पुण्यात गुन्हा दाखल   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी
  • रात्रीचा मुक्कामही मी रोडवरच करणार – गोपीचंद पडळकर
  • सरकारचं नियोजन चुकलं: प्रविण दरेकर

पुणे : भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्यावर कलम १८८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गर्दी केल्याप्रकरणी तसेच पुण्यात कोरोच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात  सहभाग घेतल्याप्रकरणी (Pune MPSC Student protest) पडळकर  यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात (vishrambag police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी

१४ मार्च रोजी एमपीएससीची होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी न जमवण्याचं आवाहन पोलिस आणि प्रशासन करत आहेत. मात्र, अशापरस्थितीत देखील हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं होत, या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी एन्ट्री घेतली होती. त्यांच्या विध्यार्थ्याच्या आंदोलनाला आणखीनच धार आली होती. दरम्यान, पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राज्य सरकारवर सडकून टीका देखील केली होती.

रात्रीचा मुक्कामही मी रोडवरच करणार – गोपीचंद पडळकर

जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. गोपीचंद पडळकर रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात घोषणबाजी करत होते. तसंच रात्रीचा मुक्कामही मी रोडवरच करणार असल्याचा त्यांनी बोलून दाखवलं मात्र त्याअगोदरच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

एमपीएससी परीक्षेमध्ये राजकारण करु नका, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. हे गोंधळलेले सरकार आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.यूपीएससी ते सीईटीच्या परीक्षा होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात. १४ तारखेलाचं होणारी परीक्षा झाली पाहिजे.

सरकारचं नियोजन चुकलं: प्रविण दरेकर

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे की, सरकारनं नियोजन करायला पाहिजे. राज्य शासनाचं नियोजन चुकलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र थांबला नाही, थांबनार नाही हे सांगून चालणार नाही त्यावर मार्ग काढा, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. 

पंकजा मुंडे यांनीही केलं होत ट्विट

पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, एमपीएससीच्या परीक्षा सरकारने रद्द आहेत हे अगदी चुकीचे आहे. एमपीएससीची तयारी करणारी मुलगा किंवा मुलगी हे शहरात अत्यंत हलाखीच्या परस्थितीत राहत असतात. अभ्यासीका जॉईन करून रात्रांदिवस आभ्यास करतात. अचानकपणे परीक्षा रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे असं मला वाटत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सर्व व्यवहार आणि व्यवसाय हे कोरोनाच्या अख्याधारित राहून चालू आहेत, मग एमपीएससीची परीक्षा का नाही असा सवाल देखील मुंडे यांनी उपस्थित केला आहे. परीक्षा रद्द केल्यान अनेक मुलाचं नुकसान होईल, त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण होईल. हा निर्ण्याबाद्द्ल मी तीव्र नापसंती व्यक्त करत असलायचं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी