Pune railway: आज ड्युटी संपवून वीकेंडला फिरायला जाताय? बॅग उचलण्याआधी पहा रेल्वेचं वेळापत्रक

पुणे
भरत जाधव
Updated Nov 19, 2022 | 16:00 IST

मेगाब्लॉकमुळे पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या जवळपास15 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास हेल्प डेस्कही सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांना गरज भासल्यास पुणे स्थानकातून जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

Finishing duty today and going  weekend picnic?
Pune railway: आज ड्युटी संपवून वीकेंडला फिरायला जाताय?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वेवर आजपासून 27 तासांचा मेगाब्लॉक आहे.
  • सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू करण्यात येणार आहे.
  • या मेगाब्लॉकमुळे पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या जवळपास15 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Pune railway: आठवडा संपत आला अनेकजण आपल्या शहराजवळील काही पिकनीक स्पॉटवर (picnic spot) वेळ घालवण्यासाठी जात असतात. परंतु ऐनवेळेवर रेल्वे गाड्याचे वेळापत्रक (Railway train schedule)बदलले तर सर्वांच्या मूड ऑफ होत असतो. आजही तुम्ही पुण्याहून (Pune)मुंबईकडे वीकेंडला फिरायला जाण्याचा विचार असेल किंवा पुण्यात नोकरी करत असाल आणि मुंबईत घरी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (Finishing duty today and going  weekend picnic? Check the train schedule) 

अधिक वाचा  : सावरकरांच्या नातवाचे नेहरुंवर गंभीर आरोप
 कारण तुमचा आज आणि उद्या प्रवासाचा बेत असेल तर वाहतूक व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊनच प्रवासाला निघा. कारण मध्य रेल्वेवर आजपासून 27 तासांचा मेगाब्लॉक (megablock)   आहे. त्यामुळे आज (19 नोव्हेंबर) ते सोमवार(21 नोव्हेंबर) पुण्याहून मुंबईकडे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  यामुळे तुमचा वीकेंड तुम्ही यावेळी साजरा करा किंवा इतरत्र ठिकाण निवडावे लागेल. 

मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. ठाणे ते मुंबई या भागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातील कोपरी ब्रिजच्या कामानिमित्त हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.

अधिक वाचा  : आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता

 या मेगाब्लॉकमुळे पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या जवळपास15 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास हेल्प डेस्कही सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांना गरज भासल्यास पुणे स्थानकातून जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक दोन दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत आहे. अनेक प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या योजना बदलल्या आहेत. गदग-मुंबई ही रेल्वे अल्पकालीन रेल्वेमुळे मुंबईऐवजी पुण्याला धावणार आहे. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे रेल्वे प्रशासनाने स्थानकावर अतिरिक्त तिकीट तपासनीस आणि व्यावसायिक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  : मोठं- मोठ्या संकाटात शांत राहतात या राशींचे लोक

 आरक्षण केंद्रावर सध्याच्या तिकीट खिडकीसह अतिरिक्त तिकीट खिडकी उघडली जाईल. प्रवाशांना दादर, कल्याणला इतर गाड्यांमधून जायचे असल्यास त्यांना इतर गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे स्थानकांवर योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांना एसटीने मुंबईला पाठवण्याचे नियोजनही रेल्वेने केले आहे, पुणे  रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले आहे. 

या गाड्या करण्यात आल्या आहेत बंद?

यात शनिवारी (दि. 19) धावणाऱ्या पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (12128), कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (17412) आणि रविवारी धावणाऱ्या मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (12127), मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेस (11007), मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेस (11009), मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस (12125), मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (12123), मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (17411), पुणे- मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (11010), पुणे - मुंबई डेक्कन क्वीन (12124), पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस (12126), पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (11008), पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (12128) आणि सोमवारी धावणारी मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (12127) रद्द झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी