अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे
रोहन जुवेकर
Updated May 25, 2022 | 15:28 IST

FIR against Actor Pushkar Jog mother : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता पुष्कर जोग यांच्या आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

FIR against Actor Pushkar Jog mother
अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर गुन्हा दाखल 
थोडं पण कामाचं
  • अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर गुन्हा दाखल
  • जोग एज्युकेशन ट्रस्टच्या ११ शाळांची बनावट कागदपत्रे तयार करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
  • आरोपींना अटक केलेली नाही पण तपास सुरू

FIR against Actor Pushkar Jog mother : पुणे : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता पुष्कर जोग यांच्या आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जोग एज्युकेशन ट्रस्टच्या ११ शाळांची बनावट कागदपत्रे तयार करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

जोग एज्युकेशन ट्रस्ट ११ शाळा चालवते. या शाळांच्या नावावर खोटी बनावट कागदपत्रे तयार करून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या काळात शाळांवरील प्रशासकाची नियुक्ती टाळण्यात आली. सर्व ११ शाळांच्या मुख्याध्यापकांद्वारे २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. शिक्षण विभागाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकारी किसन भुजबळ यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी सुरेखा जोग तसेच गौतम शंकर शडगे, किशोर पवार, हेमंत सावळकर यांच्या विरोधात भादवी ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७०, ४७१, २०१ आणि १२० ब ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक केलेली नाही. पण तपास सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी