Thergaon Queen Arrested : रील्सवर शिव्या देणे पडले महाग, थेरगाव क्वीनविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल 

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Jan 30, 2022 | 22:39 IST

इन्स्टाग्रामर रील्समधून शिव्या घालणे , अश्लील बोलणे एका तरुणीच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी साक्षी महाले या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी महाले हिचे इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन नावाचे प्रोफाईल आहे. या प्रोफाईलवर साक्षी रील्स शेअर करायची. या रील्समध्ये ती अश्लील भाषेत शिव्या द्यायची. साक्षीचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक रील्स व्हायरलही झाले होते.

Instagram Reel
इन्स्टाग्राम रील्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इन्स्टाग्रामर रील्समधून शिव्या घालणे , अश्लील बोलणे एका तरुणीच्या चांगलेच अंगलट आले आहे.
  • या प्रकरणी साक्षी महाले या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • साक्षीचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.

Instagram Reels : पुणे : इन्स्टाग्रामर रील्समधून शिव्या घालणे(abusing in instagram reels), अश्लील बोलणे (obscene speech) एका तरुणीच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी साक्षी महाले (sakshi mahale) या तरुणीविरोधात गुन्हा (fir) दाखल करण्यात आला आहे. साक्षी महाले हिचे इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन (thergaon queen) नावाचे प्रोफाईल आहे. या प्रोफाईलवर साक्षी रील्स शेअर करायची. या रील्समध्ये ती अश्लील भाषेत शिव्या द्यायची. साक्षीचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक रील्स व्हायरलही (reels viral) झाले होते. रील्समध्ये शिव्या घालत असल्याने युट्युबर काही नेटकर्‍यांनी तिला रोस्टही (youtuber roaster) केले होते. सोशल मीडियावर या तरुणीविरोधात कारवाई कशी होत नाही असा सवालही काही नेटकर्‍यांनी विचारला होता. (fir against sakshi mahile and friends for making obscene reels on instagram)

अखेर आज वाकड पोलिसांनी साक्षी महाले आणि तिचे साथीदार कुणाल कांबळे आणि साक्षी कश्यप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साम टीव्ही या वृत्तवाहिनीने याबाबत एक वृत्त दाखवले होते. या वृत्ताचा व्हिडीओही साक्षीने आपल्या रील्समध्ये शेअर करून स्वतःची वाहवा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोपीची हिंमत वाढत होती असे पोलिसांनी म्हटले. त्यामुळे आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

रील्सवर मुलासोबत अश्लील डान्स

सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी अशाच प्रकारे एका महिलेने आपल्या १२ वर्षाच्या मुलासोबत अश्लील डान्स केला होता. महिलेचे इन्स्टाग्रामवर तसे रील्स अपलोड केले होते आणि ते व्हायरल झाले होते. दिल्लीतील या महिलेविरोधात महिला आयोगाने दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनीही तत्काळ दखल घेऊन या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी