पुण्यात आग, ५०० दुकानं खाक

Fire at Fashion Street market in Camp area of Pune, 500 shops gutted पुण्याच्या कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात आगीचा मोठा भडका उडाला.

Fire at Fashion Street market in Camp area of Pune, 500 shops gutted
पुण्यात आग, ५०० दुकानं खाक 

थोडं पण कामाचं

  • पुण्यात आग, ५०० दुकानं खाक
  • १६ बंबगाड्या आणि २ पाण्याचे टँकर यांच्या मदतीने पहाटे आगीवर १ वाजून ६ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले
  • स्थानिक व्यावसायिकांचे लाख रुपयांचे नुकसान

पुणे: पुण्याच्या कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात आगीचा मोठा भडका उडाला. अग्नीशमन दलाच्या १६ बंबगाड्या आणि २ पाण्याचे टँकर यांच्या मदतीने पहाटे आगीवर १ वाजून ६ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत ५०० दुकानं जळून खाक झाली. जीवितहानी झाली नाही पण स्थानिक व्यावसायिकांचे लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अग्नीशमन दलाचे १० अधिकारी आणि ५० कर्मचारी यांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले; अशी माहिती पुणे मनपाच्या अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली. पुण्यातील फॅशन स्ट्रीट हे तोकड्या जागेतील रेडीमेड कपड्यांचे मोठे मार्केट आहे. परवडणाऱ्या दरात या ठिकाणी अनेक नवनव्या फॅशनचे कपडे उपलब्ध असतात. (Fire at Fashion Street market in Camp area of Pune, 500 shops gutted)

पुणे: कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग

पुण्यातील आगीच्या घटनेआधी मुंबईत भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली असून अशा पद्धतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही दिले आहेत.

वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या दुर्घटनाग्रस्त रुग्णालयास देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची खातरजमा करुन घेण्यात यावी असे निर्देश मी देत आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त व महापौर यांच्याशी देखील ही दुर्घटना कळताच चर्चा केली. जखमी तसेच कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहण्यास सांगितले आहे. भांडुपच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी