चांदोली अभयारण्यात वणवा, वणव्याचे सत्र सुरूच महिन्याभरातील दुसरी घटना

पुणे
प्रशांत जाधव
Updated Apr 01, 2022 | 09:59 IST

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडी नजीक असलेल्या डोंगरास आज दुपारी अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान होत आहे..

Fire in Chandoli Sanctuary  Fire incident continues for the second time in a month
चांदोली अभयारण्यात वणवा, वणव्याचे सत्र सुरूच 
थोडं पण कामाचं
  • सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत
  • चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडी नजीक असलेल्या डोंगरास आज दुपारी अज्ञातांनी लावली आग
  • आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान होत आहे..

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडी नजीक असलेल्या डोंगरास आज दुपारी अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान होत आहे... (Fire in Chandoli Sanctuary)

Chandoli Sanctuary Fire

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. वाऱ्याचा वेग भयाण असल्यामुळे तितक्याच वेगाने आग सगळीकडे पसरत होती.. धुराचे कल्लोळ परिसरभर पसरले होते.या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. 


 आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने वन्यजीवचे कर्मचारी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी