बापरे ! न्यायालयाच्या परिसरात जावयाकडून सासू अन् पत्नीवर गोळीबार

firing on wife and mother in law in shirur, accuse arrest : आरोपी हा माजी सैनिक असून, कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने जावयाने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला आहे. माजी सैनिक असणाऱ्या आरोपीचे नाव दीपक ढवळे असं आहे. दीपक ढवळे आणि त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक वाद सुरु होता. आणि याच वादातून दीपक ढवळे यांच्या पत्नीने न्यायालयात पोटगी साठीचा दावा केला होता.

firing on mother-in-law and wife at court premises
जावयाकडून सासू अन् पत्नीवर गोळीबार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिरूर येथे न्यायालयाच्या परिसरात माय-लेकींवर गोळीबार 
  • जावयाने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला आहे
  • पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली

पुणे : काही दिवसांपूर्वीच पुण्यात कारागृह अधीक्षकांच्या मुलाची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली होती. सदर घटनेने पुणे हादरून गेले होते. पुणे जिल्ह्यातील  शिरूर  (Shirur) येथे न्यायालयाच्या परिसरात माय-लेकींवर गोळीबार (Firing on mother and daughter) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

अधिक वाचा : सोन्यातील तेजी कायम, चांदीचा भावदेखील वधारला, पाहा ताजा भाव

जावयाने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा माजी सैनिक असून, कौटुंबिक वादातून आरोपी जावयाने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला आहे. माजी सैनिक असणाऱ्या आरोपीचे नाव दीपक ढवळे असं आहे. दीपक ढवळे आणि त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू होता आणि याच वादातून दीपक ढवळे यांच्या पत्नीने न्यायालयात पोटगीसाठी दावा केला होता.

अधिक वाचा : ५ जूनपासून शनि चालतोय उलटी चाल, या लोकांची वाढणार डोकेदुखी  

पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली

दरम्यान, पोटगीच्या दाव्याच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आरोपीची पत्नी आणि सासू आज न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या परिसरात थांबलेले असताना दीपक ढवळे याने स्वतः जवळच्या लायसन्स पिस्तूलमधून पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या.  या गोळीबारात आरोपीच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर जखमी झाली आहे. सासूवर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली. त्यानंतर आरोपी दीपक ढवळे याला अटक केली आहे.

अधिक वाचा ; चुकूनही पाकिटात ठेवू नका या वस्तू, ओढवू शकतात मोठी संकट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी