मोठी बातमी : लष्कर कोर्टात अखेर पूजा चव्हाण प्रकरणात पहिला खटला दाखल

पुणे
अजहर शेख
Updated Feb 26, 2021 | 20:42 IST

first case file in pune court pooja chavan case:सदर आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने प्रकरण चांगलेच तापले आहे. सदर प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, याप्रकरणी पहिली तक्रारही भाजपनेच केली आहे.

first case file in pune court pooja chavan case
मोठी बातमी : लष्कर कोर्टात अखेर पूजा चव्हाण प्रकरणात पहिला खटला दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा खटला दाखल केला
  • पुणे न्यायालयात ५ मार्चला होणार पुढील सुनावणी
  • युवा मोर्चाने पुण्यात आंदोलन करुन, संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला (Pooja Chavan case)  राजकीय वळण लागले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपने सदर प्रकरण हाती घेत, या प्रकरणात संजय राठोड (minister sanjay rathod) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan case) अखेर पहिला खटला दाखल झाला आहे. पुणे लष्कर कोर्टात (Pune court) पहिल्या खटल्याची नोंद झाली आहे. हा खटला दाखल झाल्याने संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा खटला दाखल केला

सदर खटला हा लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे (Ad. Vijay Thombre) यांनी दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांना निवेदन देऊन देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने न्यायालयात धाव घेतली असल्याचे समोर आले आहे.

पुणे न्यायालयात ५ मार्चला होणार पुढील सुनावणी

ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने दाखल केलेल्या या खटल्यावर आज युक्तीवाद झाला असून, पुणे न्यायालयात ५ मार्चला होणार पुढील सुनावणी होणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी फिर्यादी अॅड. भक्ती पांढरे यांच्या नावाने हा अर्ज दाखल करण्यात आला होता.

युवा मोर्चाने पुण्यात आंदोलन करुन, संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने प्रकरण चांगलेच तापले आहे. सदर प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, याप्रकरणी पहिली तक्रारही भाजपनेच केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांची सून आणि भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी काल वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. भाजप युवा मोर्चानेही पुण्यात आंदोलन करुन, संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. 

संजय राठोड यांना चित्रा वाघ पुन्हा म्हणाल्या 'हत्यारा’

पूजा चव्हाण ज्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्याठिकाणाची पाहणी झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला. दरम्यान चित्रा वाघ या म्हटल्या की, तुम्ही मनमानी चालवली आहे. तुम्ही किती लोकांना फसवणार आहेत. नुसत झाकाझाकी करायचे काम सुरु आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळ झोकायाचे काम वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत. आणखी या प्रकरणात एफआयआर देखील झाला नाही. दोन मुलांची प्रत्यक्षदर्शी होती त्यांना यांनी सोडून दिल असं देखील त्या म्हणाल्या. पुढे बोलताना वाघ म्हणाल्या की, पोलिसांवर दबाव आहे. आणि ते ‘वनमंत्री संजय राठोड हत्याराला’ वाचवत आहेत. पोलिसांनी काहीही तपास केलेला नाही. हातावर हात ठेवून बसले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी