Pune Fire, Pune Gas Pipeline Fire : पुण्यात गॅसच्या पाइपलाईनला आग

पुणे
रोहन जुवेकर
Updated Jan 13, 2023 | 10:18 IST

first explosion then fire in MNGL pipeline at Pune : पुण्यात सिंहगड रस्त्यावर राजाराम फुलाजवळ MNGL गॅस कंपनीच्या पाईपलाईनला आग लागली.

first explosion then fire in MNGL pipeline at Pune
पुण्यात गॅसच्या पाइपलाईनला आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुण्यात गॅसच्या पाइपलाईनला आग
  • खोदकाम सुरू असताना स्फोट झाला
  • अग्निशमन दलाच्या 3 बंबगाड्या घटनास्थळी दाखल

first explosion then fire in MNGL pipeline at Pune : पुण्यात सिंहगड रस्त्यावर राजाराम फुलाजवळ MNGL गॅस कंपनीच्या पाईपलाईनला आग लागली. खोदकाम सुरू असताना स्फोट झाला. स्फोटानंतर गॅसमुळे आगीचे मोठे लोळ आकाशाच्या दिशेने जाऊ लागले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. MNGL गॅस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ पण घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ज्या भागात आग लागली आहे त्या भागाजवळच्या दोन्ही बाजूच्या झडपा बंद करुन गॅसचा पुरवठा थांबवण्यात आल्याचे समजते. 

गॅस पाईपलाईनला आग लागल्यामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणात चौकशी होणार असून दोषींवर नियमानुसार कारवाई होणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुर्घटनेमुळे शुक्रवार 13 जानेवारी 2023 रोजी पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आग विझल्यानंतर आवश्यक ती डागडुजी करुन आणि सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी करुन घेऊन नंतरच गॅस पुरवठा पूर्ववत केला जाईल. 

नागरी वस्ती नसलेल्या भागात दुर्घटना घडली. पण दाट लोकवस्तीच्या भागात असा प्रकार घडला असता तर मोठी हानी झाली असती अशी चर्चा पुण्यात आहे. जोपर्यंत पाईपलाईनमध्ये गॅस शिल्लक आहे तोपर्यंत आग धुमसत राहणार असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

BHIM UPI Incentive Scheme: यूपीआय पेमेंट आणि रुपे डेबिट कार्डच्या वापरावर मिळणार इन्सेन्टिव, जाणून घ्या स्कीम

Bank Holidays : बँकेची कामं करा लवकर, जानेवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँका असणार बंद

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी