पुणे हादरले! अल्पवयीन मुलीला वाढदिवसाला बोलावून गँगरेप

पुणे
अजहर शेख
Updated Mar 29, 2021 | 16:35 IST

Gang rape of a minor girl in Pune : वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला.

Gang rape of a minor girl in Pune
पुणे हादरले! अल्पवयीन मुलीला वाढदिवसाला बोलावून गँगरेप  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • १५ दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस
  • याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली
  • पोलिसांनी यातील ५ जणांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली.

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दिसून येत आहे. दरम्यान, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असून, पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Pune gangrape) झाल्याचा प्रकार घडल्याचे समोर आल्याने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून त्यांनाही तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याने सांगून गोळीबार केल्याचा प्रकारही समोर आला आहे.

१५ दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस

पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला अटक केल्यानंतर, त्याची सखील चौकशी करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशीत १५ दिवसांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली

सदर अल्वायीन पीडित मुलगी ही जनता वसाहतीत राहते. या १४ वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिसांनी यातील ५ जणांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली. निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

 नेमकं घडलं आहे नेमकं प्रकरण?

वाढदिवसानिमित्त पार्टी असल्याचं सांगून सदर १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला बोलावलं होत. सदर मुलगी वाढदिवसाची पार्टी  आली. यावेळी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. नराधम यावरच थांबले नाहीत, त्यांनी आणखी दोन मित्रांना तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याचे तिला सांगितले. मात्र, पीडित मुलीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास चक्क नकार दिला. पीडीतेने नकार देताच आरोपींनी चक्क गोळीबार देखील केला असल्याचे उघड झाले आहे.  १५ दिवसापूर्वी आरोपींनी पीडित मुलीला वाढदिवसासाठी बोलावलं होतं. १५ दिवसापूर्वी झालेली ही घटना आता उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पुणे परिसर हादरुन गेला आहे.

मित्रानेच केला मैत्रिणीवर पर्वतीच्या जंगलात बलात्कार

पुण्यात बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले होते. दरम्यान पुन्हा बलात्कारच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. मैत्रीचा फायदा घेत पुण्यात बलात्काराची घटना घडली आहे. दोघांची ओळखीतून मैत्री झाली होती. सदर तरुणाने पीडित तरुणीला रात्री दहा वाजता पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलावून घेतले आणि तरुणाने तिच्यावर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बलात्कारानंतरही आरोपीकडून तरुणीला त्रास

दरम्यान सदर तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तो सदर तरुणीला त्रास देत होता. आणि तरुणाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तिने पोलिसांकडे धाव घेऊन घेतली आणि आपली कैफियत पोलिसाकडे मांडली असता याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी