राष्ट्रपती राजवट लागू करण्यास शुभेच्छा, शरद पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका

राज्य सरकार स्थिर ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत.

 Good luck to apply the President's rule in the state, Sharad Pawar Pawar on Chandrakant Patil
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास शुभेच्छा, शरद पवारांची चंद्रकांत पाटलांवर टिका । राज्यातील सर्वसामान्य जनतेनं त्याची नोंद घेतलेली नाही.  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांनी टोला लगावला
  • राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
  • राज्यातील सर्वसामान्य जनतेनं त्याची नोंद घेतलेली नाही

सातारा : सध्या राज्यात विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात दररोज नवनवीन मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलल (Chandrakant Patil)  यांनी राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात खिल्ली उडवली आहे. (Good luck to apply the President's rule in the state, Sharad Pawar Pawar on Chandrakant Patil)

आदरणीय शरदरचंद्र पवार यांच्या शुभहस्ते आज सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, व्हा.चेअरमन ऍड.भगीरथ शिंदे, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर अन्य मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पत्रकरांशी बोलताना पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला स्पष्ट बहुमत आहे. राज्याला स्थिर सरकार देण्यात उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत, त्यामुळं जे अस्वस्थ आहेत, ते लोक अशा प्रकारची विधानं करत असतात. त्यांनी यापूर्वीही अशी विधानं अनेकदा केली आहेत, पण राज्यातील सर्वसामान्य जनतेनं त्याची नोंद घेतलेली नाही. त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळं मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही,' असं शरद पवार म्हणाले.

 विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिलेली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी या संदर्भात राज्यपालांची भेट घेतली असता अभ्यास करून निर्णय घेण्याचं आश्वासन राज्यपालांनी दिलं. त्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी