गुढीपाडव्यादिवशी पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, 'त्या' दाम्पत्याला मिळाला डिस्चार्ज

पुणे
पूजा विचारे
Updated Mar 25, 2020 | 10:50 IST

आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  कोरोनाची लागण झालेले राज्यातील पहिले दाम्पत्य कोरोनामुक्त झाले आहे.

Pune corona virus couple
'त्या' दाम्पत्याची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
  • आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
  • कोरोनाची लागण झालेले राज्यातील पहिले दाम्पत्य कोरोनामुक्त झाले आहे.

पुणेः जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. देशभरासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पण त्यातच आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  कोरोनाची लागण झालेले राज्यातील पहिले दाम्पत्य कोरोनामुक्त झाले आहे.  पुण्याचे रहिवासी असलेल्या संबंधित दाम्पत्याची दुसऱ्यांदा चाचणी झाली असता, त्याचे अहवालही निगेटिव्ह आलेत. या दाम्पत्याला आज (25 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना अॅम्ब्युलन्समधून घरी सोडण्यात आलं. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या घरी परतलं आहे. याच्यासोबत आणखी 3 करोना रुग्णही बरे झाल्याने त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 5 जणांनी कोरोनावर पूर्ण मात केली आहे. 

होळीच्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुबईला जाऊन आलेल्या या दाम्पत्यातील पत्नीला आधी कोरोनाचे निदान झाले, त्याच दिवशी पतीचाही अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिले कोविड-19 चे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या 14 दिवसांपासून त्या दाम्पत्यावर उपचार सुरू होते.  चौदा दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे नमुने पुन्हा एकदा घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 9 मार्चला पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हे दोघे रुग्ण पती-पत्नी होते. ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत 1 मार्चला दुबईवरुन आले होते. 9 मार्चनंतर पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागली. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते. दरम्यान त्यानंतर त्यांच्याशी संपर्कात आलेली त्यांची मुलगी आणि डायव्हरलाही या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर मात्र अजूनही उपचार सुरु आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी