पुस्तकांचं गाव भिलारला राज्यपालांनी दिली भेट

पुणे
रोहन जुवेकर
Updated May 07, 2022 | 17:16 IST

Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari visit Bhilar : पुस्तकांचं गाव (village of books) अशी ओळख मिरविणाऱ्या भिलार (Bhilar) या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातल्या गावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. 

Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari visit Bhilar
पुस्तकांचं गाव भिलारला राज्यपालांनी दिली भेट 
थोडं पण कामाचं
  • पुस्तकांचं गाव भिलारला राज्यपालांनी दिली भेट
  • भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके
  • भिलार हे आदर्श गाव

Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari visit Bhilar : भिलार : पुस्तकांचं गाव (village of books) अशी ओळख मिरविणाऱ्या भिलार (Bhilar) या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातल्या गावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. 

भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल  कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला.

प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवास्थानी छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. या ठिकाणालाही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील तसेच भिलार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी