बारामती : प्रत्येक तरुण – तरुणीला आपले लग्न व्हावे आणि संसाराचा गाडा सुखाने चालवा अशी इच्छा असते. लग्न होण्याअगोदर सुखी संसाराची अनेक स्वप्न दोघांकडूनही रंगवली जातात. पण म्हणतात ना काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तशा गोष्टी घडू नये म्हणून आपण अतोनात प्रयत्न करु शकतो. पण काही वेळेला काय घडावं हे आपल्याही हातात नसतं. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती येथे घडली आहे. एका तरुणाचे ज्या मंडपात लग्न झालं, त्याचं मंडपात त्याचा मृतदेह ठेवण्याची दुर्देवी वेळ त्याच्या कुटुंबीयांवरती आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा ; स्वत:हून राजीनामा द्या, मिळतील चांगले फायदे, अॅमेझॉनची ऑफर
मिळालेल्या माहितीनुसा, सचिन उर्फ बबलू येळे या तरुणाचे लग्न कुटुंबातील लोकांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. लग्नाच्या नंतर अवघ्या काही दिवस घरातील वातावरण हे आनंदाचे होते होते. मात्र, ज्या मुलीला नवरी म्हणून घरी आणलं त्या मुलीचे कुंकू अवघ्या सहा दिवसातचं पुसलं गेलं आहे. सचिन उर्फ बबलू येळेचा लग्नाच्या अवघ्या सहा दिवसातचं हृदयविकाराच्य तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुर्देवाने ज्या मंडपात लग्न झाले त्याच मंडपात मृतदेह ठेवण्याची वेळ आली. संबंधित घटना ही बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे. घरामध्ये लग्न कार्याचा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या येळे कुटुंबीयांमध्येही होता. मात्र येळे कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला.
अधिक वाचा : उद्धव ठाकरे कडाडले,कर्नाटकच्या CMचा ठाकरी शैलीत घेतला समाचार
लग्नासाठी घरासमोर येळे कुटुंबाने मंडप उभारला होता. आता या मंडपातच नवऱ्या मुलाचा मृतदेह ठेवण्याची दुर्दैवी वेळ येळे कुटुंबावर आली. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या देखील डोळ्यांमध्ये पाणी आलं आहे. दरम्यान, अवघ्या सहा दिवसांपूर्वीच लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा राहिलेल्या सचिन उर्फ बबलू येळे याचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा ; मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही स्टेटस ठेवून झाला मृत्यू