ST संप : FIR मध्ये धक्कादायक माहिती समोर; अॅड.सदावर्तेच्या ओकलेल्या आगीमुळे सिल्हर ओकवर धावला कर्मचाऱ्यांचा लोढा

पुणे
भरत जाधव
Updated Apr 09, 2022 | 15:14 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष (President of the NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी कथित एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) राडा घातल्याने प्रकरणाला नवे वळण लागले आहे. कारण अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी केलेल्या चिथावणीखोर (provocative ) भाषणामुळेच एसटी कर्मचारी सिल्हर ओकवर धावून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Gunaratna Sadavarte's provocative
कर्मचारी सिल्हर ओकवर जाणार असल्याचं पोलिसांना होतं ठाऊक (संग्रहित छायाचित्र))  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं.
  • पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री या बाबत बैठक झाली होती.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष (President of the NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी कथित एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) राडा घातल्याने प्रकरणाला नवे वळण लागले आहे. कारण अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी केलेल्या चिथावणीखोर (provocative ) भाषणामुळेच एसटी कर्मचारी सिल्हर ओकवर धावून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदल्या दिवशीच गुणरत्न सदावर्ते याने चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरी दुपारी ३ वाजताच पोहोचणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पण पोलीस वेळेवर पोहोचू शकले नाही, असं पोलीस एफआयआरमध्ये उघड झालं आहे. 

पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सात एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसंच प्रसार माध्यमांशी बोलत असताना “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता. या प्रतिक्रियेला प्रेरीत होऊन आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला होता. दुपारी ३ वाजताच पोलिसांना माहिती मिळाली होती. आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी मिळाली होती. तरीदेखील पोलीस वेळेवर पोहचू शकले नाहीत. सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळेच आंदोलक सिल्व्हर ओकवर पोहोचले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती. याकरिता काही जणांवर जबाबदारी देखील दिली गेली होती. या मुद्दांचा आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान आंदोलक शरद पवार यांच्या घरावर जाणार असल्याची माहिती असताना पोलीस तेथे का पोहोचले नाही याविषयी प्रश्न उपस्थित होतं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी