Pune latest News: देशातील विविध भागात H3N2 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याच दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यात आतापर्यंत H3N2 विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे. हे रुग्ण जानेवारी ते मार्च या कालावधीत आढळून आले आहेत.
बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण हे 19 ते 60 या वयोगटातील असल्याचं वृत्त आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात तापसणीसाठी 109 संशयित रुग्णांचे नमुने आले होते. या 109 संशयित रुग्णांच्या तपासणीचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. पुण्यातील बाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता खासगी रुग्णालयांनाही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा : हे 2 पदार्थ वापरा अन् मासिक पाळीच्या वेदना पळवा
इन्फ्लूएंझा A एच3एन2 व्हायरसच्या (H3N2 Virus)रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. ICMRने दिलेल्या माहितीनुसार, H3N2इतर व्हायरसपेक्षा जास्त प्रभावी आहे. या व्हायरसने त्रस्त असलेले लोक मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होऊ लागले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या H3N2 रुग्णांपैकी 92 टक्के रुग्णांना ताप, 86 टक्के रुग्णांना खोकला, 27 टक्के श्वासोच्छवास आणि 16 टक्के अस्वस्थ वाटतं.
हे पण वाचा : तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे
H3N2 बाधित दोघांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे कर्नाटकातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे तर दुसरा मृत्यू हरियाणातील एका बाधिताचा झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, H3N2 विषाणूच्या लक्षणांमध्ये सौम्य सर्दी, ताप, न्यूमोनिया, तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम यांचा समावेश होतो. ही लक्षणे गंभीर असली तरी बाधित व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. तसेच यावेळी इन्फ्लूएंझा ए विषाणू उपप्रकार H3N2 मुळे श्वसनमार्गाचे अनेक संक्रमण वाढले आहेत. त्याच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने वेदना आणि घसा खवखवणे, शरीर आणि स्नायू दुखणे, अतिसार, नाक वाहणे, शिंका येणे, थरथरणे, खोकला आणि ताप यांचा समावेश होतो.