Health Recruitment Paper Leak: मंगल कार्यालयात वाटले पेपर; विद्यार्थ्यांकडून घेतली 1 ते दीड लाख, भाजयुमोच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

पुणे
भरत जाधव
Updated Dec 22, 2021 | 15:10 IST

Health Department राज्यात आरोग्य विभाग (Health Department), टीईटी परीक्षा (TET Exam), म्हाडा परीक्षां (Mhada Exam) चे पेपर फुटल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. वारंवार होत असलेल्या पेपरफुटीमुळे भाजपकडून महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi Sarkar) वर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

Health Department  Paper leak
आरोग्य विभाग पेपर लीक प्रकरण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संजय सानप हा भाजयुमोचा माजी पदाधिकारी आणि विद्यमान उपसरपंच
  • आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचा सहसंचालक महेश सत्यवान बोटले याने परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर पेपर फोडला होता.
  • पेपरसाठी एका विद्यार्थ्याकडून एक ते दीड लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Health Department Recruitment Paper Leak : मुंबई : राज्यात आरोग्य विभाग (Health Department), टीईटी परीक्षा (TET Exam), म्हाडा परीक्षां (Mhada Exam) चे पेपर फुटल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. वारंवार होत असलेल्या पेपरफुटीमुळे भाजपकडून महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi Sarkar) वर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान आरोग्य विभागाचे पेपरफुटी प्रकरणी बीड (Beed) मध्ये एका भाजप (BJP) च्या माजी पदाधिकाऱ्याला पोलिसांनी (Police) अटक(Arrested) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींने परीक्षा पेपर मंगल कार्यालयात (Mangal Karyalaya) वाटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांकडून आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड भरती परीक्षेतील गैरप्रकाराचा शोध सुरू आहे. पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या बीडच्या संजय शाहुराव सानप याला अटक केली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील वडझरी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. यामुळे आरोग्य विभाग भरती परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी मराठवाड्यातील आरोपींची संख्या वाढलीय. संजय सानप हा भाजयुमोचा माजी पदाधिकारी आणि विद्यमान उपसरपंच असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंगलकार्यालयात आरोग्य विभागाच्या पेपरचं वाटप

आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचा सहसंचालक महेश सत्यवान बोटले याने परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर पेपर फोडला होता. संजय सानप याने या पेपरची वाटप बीडमधील एका मंगल कार्यालयात केल्या धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले 1 ते दीड लाख रुपये 

संजय सानप याने पेपर फोडण्याच्या बदल्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1 ते दीड लाख रुपये घेतले आहेत. एक पेपर शंभर ते दीडशे जणांना देण्यात आल्याची माहिती आहे. संजय सानपच्या अटकेवरुन आरोग्य विभाग भरती परीक्षेतील रॅकेट उच्च अधिकाऱ्यांपासून ते ग्रामीण भागात पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

संजय सानपचे भाऊ आरोग्य विभागात नोकरीला?

आरोग्य सेवा गट ड परीक्षेत गैरव्यवहार करण्यात आल्याच्या आरोपात संजय शाहूराव सानप याचाही सहभाग आढळून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर, संजय सानप याचे तीन भाऊ आरोग्य विभागात नोकरीला असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबद्दल अटकेत असलेला राजेंद्र सानप आणि संजय सानप हे दोघे एकाच गावचे आहेत. 

संजय सानपचं राजकीय कनेक्शन

पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेला संजय सानप हा भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी आहे. संजय सानप हा सध्या वडझरीचा विद्यमान उपसरपंच आहे. संजय सानपचे बीड शहरात देखील निवासस्थान आहे. दरम्यान, संजय सानपच्या अटकेने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. 

बीडमध्ये आठ जणांना अटक 

पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत आरोग्य भरती घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार महेश बोटले, खलाशी प्रकाश मिसाळ हे दोघे सोडले असता इतर आरोपही हे मराठवाड्यातील आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, बुलडाणा येथील आहेत. बीडमधील 8 आरोपींना अटक झाली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी