rajesh tope on indurikar maharaj : कोरोना प्रतिबंधक लस घेणार नाही निवृत्ती महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली प्रतिक्रिया

health minister rajesh tope on indurikar maharaj : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणार नाही, असं वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

health minister rajesh tope on indurikar maharaj
इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राजेश टोपेंची प्रतिक्रिया   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोना प्रतिबंधक लस घेणार नाही - निवृत्ती महाराज इंदुरीकर
  • जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे – राजेश टोपे
  • महाराष्ट्राचे जे टार्गेट आहे त्याच्या ७३ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झालं आहे - राजेश टोपे

rajesh tope on indurikar maharaj : बारामती : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लस नागरिकांनी घ्यावी यासाठी सरकार वेगवेगळ्या जाहिराती आणि प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, सतत चर्चेत असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काल कीर्तन करत असताना केलेल्या केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर ( indurikar maharaj indurikar ) यांनी कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) घेणार नाही, असं वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या या विधानावरून सोशल मिडिया ( social media ) वरती देखील त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( health minister rajesh tope ) यांनी सांगितले आहे.

जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे – राजेश टोपे

पुढे बोलतना मंत्री राजेश टोपे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी.  इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते. त्यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अस देखील टोपे म्हणाले. त्याचबरोबर जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे. महाराजांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र,  वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी कोरोनाच्या लसीकरणाबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्राचे जे टार्गेट आहे त्याच्या ७३ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झालं आहे

महाराष्ट्राचे जे टार्गेट आहे त्याच्या ७३ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झालं आहे. जर केंद्र आणि राज्याच्या आकडेवारीमध्ये फरक असेल तर आपण जुळवणी करण्याचा काम करू तसंच,  राज्यात ७ कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. ३ कोटी लोकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे., असंही टोपे म्हणाले. 

आमचे आकडे खरे आहेत त्यामुळे दिशाभूल करण्याच काहीही कारण नाही

पहिल्या दिवशीपासून आपण कधीही आकडे लपवले नाहीत. कोविन अॅपवर अतिशय पारदर्शक डेटा असतो त्यावर पूर्ण आकडेवारी आहे आमचे आकडे खरे आहेत. त्यामुळे दिशाभूल करण्याच काहीही कारण नाही, असंही टोपे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी