मुंबई ते बारामती पावसाचा धुमाकूळ... पाहा राज्यातील पावसाची नेमकी बातमी

पुणे
रोहित गोळे
Updated Oct 15, 2020 | 10:44 IST

Maharashtra Rains: राज्यभरात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, कोकणसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला यावेळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुराची स्थिती उद्भवली आहे. 

Maharashtra Rains
मुंबई ते बारामती पावसाचा धुमाकूळ, पाहा पावसाची नेमकी बातमी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस
  • पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार
  • पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा धुमाकूळ

मुंबई: मुंबईसह (Mumbai) संपूर्ण राज्याला (Maharashtra) पावसाने झोडपून काढलं आहे. बंगालच्या उपसागरातील कमीच दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) बरसत आहे. त्यामुळे हवामान खात्याने देखील रेड अलर्ट (Red Alert) जारी करत राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली आहे. 

मुंबई आणि जवळच्या परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस बरसत होता. मात्र आता इथे पावसाने काहिशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान, मुंबई जवळील ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरीत या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा जोर कायम आहे. 

पाहा राज्यात कुठे-कुठे पावसाची काय स्थिती: 

  1. मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईच्या हिंदमाता, सायन, परळ यासह अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तसंच पुढील २४ तास देखील पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.  
  2. पुणे: पावसाचा सर्वाधिक तडाखा हा पुण्याला बसला आहे. कारण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण पुणे शहर हे पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळे अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अद्यापही पुण्यात पाऊस सुरुच असून पाणी ओसरलेलं नाही.
  3. बारामती: पुण्याजवळील बारामतीत देखील तुफान पाऊस पडल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी बारामतीमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच यामुळे शेतीचं देखील बरंच नुकसान झालं आहे. 
  4. सातारा: सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याता आला आहे. 
  5. कोल्हापूर: दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी पुन्हा वाढली आहे. तसंच कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी