Raj Thackeray : पुण्यात हायहोल्टेज सभा; दहा वाजता राज ठाकरे तोफ डागणार, कोण असणार निशाण्यावर?

पुणे
भरत जाधव
Updated May 22, 2022 | 08:50 IST

अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द झाल्यनंतर आज मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला.

Raj Thackeray's high voltage meeting today, find out when and where?
आज राज ठाकरेंची हायहोल्टेज सभा, जाणून घ्या कधी अन् कुठे?   |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर
  • राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध

Raj Thackeray Pune Rally News Updates : पुणे :  अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द झाल्यनंतर आज मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. अयोध्या दौरा का रद्द करण्यात आला यावरही राज ठाकरे बोलणार आहेत. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. 

दरम्यान, गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार, भाजप सरकार बृजभूषण सिंह असण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भातदेखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. या सभेबाबात राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यासोबत बैठक घेतली. बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं की, नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. 

राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार होते. मात्र राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध केला होता.  रज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली  होती. "माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या," असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी