कशी आहे खासदार राजीव सातव यांची तब्येत?

पुणे
अजहर शेख
Updated May 04, 2021 | 18:01 IST

How is MP Rajiv Satav's health? राजीव सातव यांचे वय ४५ वर्षे असून, राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत.

How is MP Rajiv Satav's health?
कशी आहे खासदार राजीव सातव यांची तब्येत?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली
  • सातव यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती
  • २०१९  मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा सातव यांचा निर्णय

पुणे : काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुणे (pune) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. मात्र, सातव यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची (oxigen) पातळी कमी झाली होती ती आता सामान्य स्थितीत आली असून, त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राजीव सातव (Rajiv Satav) यांची तब्येत आणखी सुधारेल, अशी माहिती  त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. २३ एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. राजीव सातव यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावे म्हणून राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती.

सातव यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती

२२ एप्रिल रोजी ट्विटरवरुन कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील सातव यांनी केलं होतं. सातव यांची तब्येत बिघडत असल्याने त्यांना पुणे येथून मुंबईला हलविण्यात येणार बाबतीत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत होती. सातव यांच्यावर सध्या पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नेमकं कोण आहेत राजीव सातव?

शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांचे वय ४५ वर्षे असून, राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. सातव यांना चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार देखील मिळाला आहे. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

 

२०१९  मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय

गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली असून, राजीव सातव यांनी स्वतःहून २०१९  मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी