Pune मधील वाहतूक कोंडी कशी सोडवणार?, Nitin gadkari यांनी सांगितला मास्टर प्लॅन

PUNE Traffic : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील चांदणी चौक परिसराची पाहणी केली. वाहतूकीसाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता चांदणी चौक परिसरातील काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

How to solve the traffic jam in Pune?, Nitin Gadkari said the master plan
Pune मधील वाहतूक कोंडी कशी सोडवणार?, Nitin gadkari यांनी सांगितला मास्टर प्लॅन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चांदणी चौकावरील पूल येत्या दोन-तीन दिवसांत पाडून त्याच ठिकाणी नवीन पूल बांधणार
  • चाकण भागात इलिव्हेटेड हाय-वे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • पुणे-औरंगाबाद रस्त्यावर तीन मजली उड्डाणपूल बांधण्यात येणार

पुणे : पुणे-शिरूर अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर तीन मजली उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यासह पुणे शहरापासून अनेक शहरांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येणार असून, या सर्व मार्गांची रचना नगर नियोजनानुसार करण्यात येणार आहे. (How to solve the traffic jam in Pune?, Nitin Gadkari said the master plan)

अधिक वाचा : Mumbai: बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचा तरुणांनी बनवला न्यूड व्हिडिओ आणि मग...

पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पुणे विभागातील रस्ते विकास आराखड्यांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, चांदणी चौकावरील पूल येत्या दोन-तीन दिवसांत पाडून त्याच ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार असून, त्याचे उद्घाटन पुढील वर्षी जूनमध्ये होणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता नितीन गडकरी यांनी विशेष प्रकारच्या बसेस चालवण्याची घोषणा केली. त्यासाठीच्या निधीबाबतही त्यांनी सांगितले आणि यामध्ये लोकप्रतिनिधींच्या सहभागाची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे सांगितले.

अधिक वाचा : Devendra Fadnavis आणि Ashok Chavan यांच्या भेटीने चर्चांना उधाण, दोघांमध्ये राजकीय खलबतं?

नितीन गडकरी म्हणाले की, पुण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू करण्याची योजना आहे, मात्र इलेक्ट्रिक डबल डेकर बसची किंमत जास्त आहे. त्यासाठीही विविध पर्याय आहेत. जमिनीवरून केबलवर धावणाऱ्या बसेसची किंमत कमी असते. हाही विचार करण्याचा प्रयत्न आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. एक बस असेल आणि दुसरी ट्रॉली असेल परंतु अनेक मुद्दे आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

अधिक वाचा : Sudhir Mungatiwar : राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी २३ मंत्री, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, सुधीर मुनंगटीवार यांची माहिती

राष्ट्रीय महामार्गालगत जागा दिल्यास त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारण्याची तयारी सुरू आहे. लॉजिस्टिक पार्कसाठी 2 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेदभवनच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये या कामाची निविदा काढण्यात आली होती. नऊ खासगी मालमत्ता संपादित करायच्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी कामाला लागले आहेत.

चाकण एमआयडीसीपासून २७ किमी अंतरावर पावलेवाडी येथे १८० हेक्टरमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्य करारही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प संयुक्तपणे राबविला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी