HSC Result 2020 Update: 'MSBSHSE' बारावीचा निकाल जाहीर झालेला नाही, लिंक देखील भलतीच!

पुणे
प्रशांत जाधव
Updated Jul 15, 2020 | 08:50 IST

MSBSHSE HSC Result 2020: बारावीचा निकाल 2020 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

 HSC Results 2020 links activated on mahresult.nic.in, check for more MSBSHSE HSC updates
"MSBSHSE' बारावीच्या निकाल जाहीर झालेला नाही (फोटो सौजन्य: mahresult.nic.in) 

थोडं पण कामाचं

  • बारावीच्या निकालाची तारीख अद्यापही जाहीर नाही
  • बोर्डाने बारावीच्या निकालाची अद्याप घोषणा केलेली नाही
  • अधिकृत वेबसाइटवर झाली होती चुकीची लिंक अॅक्टिव्हेट

बारावीचा निकाल 2020 (MSBSHSE HSC Result 2020): पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC result 2020) या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल ऑनलाइन जाहीर होणार असून या mahresult.nic.in. अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. अद्याप तरी बोर्डाकडून निकालाची कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, काल (१४ जुलै)बोर्डाने मोठा घोळ घालून ठेवल्याचं आता समोर आलं आहे. कारण या अधिकृत वेबसाइटवर बोर्डाने HSC Result 2020 ही निकालाची लिंक अॅक्टिव्हेट केली होती. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता स्पष्ट झालं आहे की, बारावीचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही. काल जी लिंक अॅक्टिव्हेट झाली होती ती गेल्या वर्षीची होती. 

(काल अधिकृत वेबसाइटवर लिंक अॅक्टिव्हेट झाल्याचं दाखवण्यात येत होतं. मात्र, आता बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की, ही लिंक गेल्यावर्षीची असून यंदाचा निकाल अद्याप तरी जाहीर करण्यात आलेला नाही.)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा निकाल (Maharashtra board HSC result 2020) १५ ते २० जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल हा मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे याला बराच उशीर झाला आहे. दरम्यान, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे की, १५ ते २० जुलै दरम्यान १२वीचा निकाल जाहीर केला जाईल, असे . बारावीच्या परीक्षेचा निकाल आपण mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. यावेळी त्यांना आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून ऑनलाइन निकाल पाहता येईल. दरम्यान, बारावीचा निकाल हा एसएमएसद्वारे देखील पाहता येणार आहे.     

यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाल्याने यंदा याचा परिणाम थेट निकाल जाहीर करण्यावर झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २८ मे २०१९ रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. 

कसा पाहाल आपला निकाल? 

  1. रिझल्ट पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  2. त्यानंतर Maharashtra HSC result 2020 क्लिक करा 
  3. त्यानंतर एक विंडो सुरु होईल. 
  4. इथे आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिट करा. 
  5. त्यानंतर काही क्षणात रिझल्ट आपल्या स्क्रीनवर येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी