Maharashtra Board HSC Result 12th 2022: बारावीचा निकाल जाहीर; ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, चेक करा या लिंकवर

Maharashtra HSC 12th Result 2022 Declared: बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे.

HSC Result MSBSHSE Declared 2022 online check indiaresults official website mahresult nic in, www.maharesult.nic.in, maharesult.nic.in
बारावीचा निकाल जाहीर; चेक करा या लिंकवर  

HSC Result MSBSHSE Declared 2022 online, mahresult nic in,  www.maharesult.nic.in, maharesult.nic.in : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MHBHSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहता येणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६३ टक्के इतकी होती. (HSC Result MSBSHSE Declared 2022 online check indiaresults official website mahresult nic in,  www.maharesult.nic.in, maharesult.nic.in )

अधिक वाचा : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकालाच्या लाइव्ह अपडेट्स पाहा 


पुढील वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल -

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in

अधिक वाचा : बारावीचा निकाल पाहताना साईट झाली हँग? इथे पहा निकाल

Maharashtra Board 12th Result 2022 Live : महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल 2022, कसा तपासायचा

 1. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
 2. होमपेजवर, MSBSHSE 10वी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
 3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
 4. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.
 5. बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. 

अधिक वाचा : ​HSC निकाल सर्वांच्या आधी पाहण्यासाठी 'या' ट्रिक्स आणि टिप्स

महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल 2022 जाहीर

शाखानिहाय निकाल-
विज्ञान - ९८.३०
कला - ९०.५१
वाणिज्य - ९१.७१
व्यवसाय अभ्यासक्रम - ९२.४०

MSBSHSE HSC Result 2022 check Offline: १२वीचा निकाल पाहा एका SMSवर, जाणून घ्या कसा

 1. स्टेप १ - मोबाइलवरील SMS ऍप्लिकेशनवर जा.  MHHSC टाईप करुन तुमचा सीट नंबर टाईप करा. 
 2. स्टेप २ -   महाराष्ट्र SSC निकाल 2022 साठी प्रकार - MHSSCआसन क्रमांक. आणि msbshse निकालासाठी 2022 टाइप करा - MHHSCआसन क्रमांक.
 3. स्टेप ३ - या नंतर हा एसएमएस तुम्ही 57766 या क्रमांकावर पाठवा.
 4. स्टेप ४ - हा एसएमएस पाठविल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तुम्हाला बोर्डाकडून एसएमएस येईल आणि त्यामध्ये तुम्ही निकाल पाहू शकता. 

निकालाबाबत महत्त्वाच्या गोष्टी... 

 1. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४,४९,६६४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३९,७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,५६,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.
 2. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५५२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ आहे.
 3. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.२१%) सर्वाधिक तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९०.९१%) आहे.
 4. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९५.३५ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यापेक्षा २.०६% ने जास्त आहे.
 5. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ६३३३ दिव्यांग विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६३०१ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६००१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९५.२४ आहे.
 6.  इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. एकूण १५३ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० % आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी