husband clash with wife : पती-पत्नीच्या भांडणात शेजाराच्या घरांना लागली आग, संतप्त ग्रामस्थांनी दिला चोप

पुणे
Updated Oct 19, 2021 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर रागावलेल्या पतीने चक्क आपल्या घरालाच आग (fire) लावली. घर पेटवल्यानंतर त्यांच्या शेजारील 10 घरांनीही पेट घेतला.

Husband clash with wife: Neighbor's house caught fire in husband-wife quarrel, angry villagers beat up
husband clash with wife : पती-पत्नीच्या भांडणात शेजाराच्या घरांना लागली आग, संतप्त ग्रामस्थांनी दिला चोप   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पती पत्नीशी भांडण झाले.
  • पाटण तालुक्यातील माजगावमधील घटना
  • पतीने स्वतःच आपल्या घऱाला आग लावली.

सातारा : घऱगुती कारणावरुन नेहमीच पत्ती पत्नीची भांडणे होत असतात. त्यामुळे रुसाफुगी, मारहाण आणि शिवीगाळ झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या, एकल्या आणि वाचल्या असतील. पण पाटण तालुक्यातील माजगावमध्ये घडलेली घटना निराळीच अशी आहे. सोमवारी घरगुती कारणावरुन पती पत्नीशी भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की पतीने स्वतःच आपल्या घऱाला आग लावली. अन् या आगीत शेजारची तब्बल १० घरं जळून खाक झाल्याने खळबळ उडाली. (Husband clash with wife: Neighbor's house caught fire in husband-wife quarrel, angry villagers beat up)

माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे सुरु होती. रागाच्या भरात संजयने घराला आग लावली. यात आगीमुळे घऱातील सिलेंडरचा स्फोट झाला. आणि या स्फोटामुळे शेजारची तब्बल १० घरांनी पेट घेतला. आगीमुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. ग्रामस्थांनी आ विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने सर्व काही जळून खाक झाले..

https://youtu.be/4OWYlPI6Ugc

यात आग लागलेल्या घऱातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे ज्या लोकांची घरे जळाली ते संतापले होते. त्यांनी संजय पाटील याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन गुन्हा दखल करत आरोपी संजय पाटील याला अटक केली आहे.

या आगी च्या घटनेत सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पती आणि पत्नी यांच्यात वाद नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण दोघांच्या भांडणात त्यांच्यासह शेजारच्या दहा घरांची राखरांगोळी झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी