राष्ट्रवादीत प्रवेश घेताना मनात उमटलेल्या भावना पहिल्यांदाच रुपाली ठोंबरें केल्या शेअर , म्हणाल्या..तेव्हा मला ईडी कार्यालयात घेऊन जात आहेत की काय असं वाटलं

i am going ed office says rupali-patil : रुपाली पाटील यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माझा राष्ट्रवादी प्रवेश हा नियोजित नव्हता. प्रवेशाला जाताना मला वाटलं ईडी कार्यालयात नेतात का काय? अस वाटत होत.  असं त्या म्हणाल्या.

i am going ed office says rupali-patil
तेव्हा मला ईडी कार्यालयात घेऊन जात आहेत की काय असं वाटलं   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश घेताना मनात उमटलेल्या भावना पहिल्यांदाच शेअर केल्या आहेत.
  • माझा राष्ट्रवादी प्रवेश हा नियोजित नव्हता – रुपाली ठोंबरे
  • प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना रुपाली यांची धडाकेबाज कामगिरी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र , रुपाली ठोंबरे यांनी मनसेला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मी जात होते. तेव्हा मला ईडी कार्यालयात घेऊन जात आहेत की काय अशी भावना मनात निर्माण झाली होती, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. रुपाली ठोंबरे  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश घेताना मनात उमटलेल्या भावना पहिल्यांदाच शेअर केल्या आहेत.

माझा राष्ट्रवादी प्रवेश हा नियोजित नव्हता – रुपाली ठोंबरे

यावेळी रुपाली पाटील यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माझा राष्ट्रवादी प्रवेश हा नियोजित नव्हता. प्रवेशाला जाताना मला वाटलं ईडी कार्यालयात नेतात का काय? अस वाटत होत.  असं त्या म्हणाल्या. रुपाली ठोंबरे या बारामतीत आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक-२०२१ आयोजन बारामतीत करण्यात आलं होतं. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने उपस्थित होते.

ठोंबरे यांनी लुटला क्रिकेटचा आनंद

दरम्यान, राजकारणाच्या आखाड्यात फटकेबाजी करणाऱ्या रुपाली पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली. रुपाली पाटील यांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटला. तसेच स्वत: मैदानावर उतरून त्यांनी बॅटिंगचा देखील आनंदही लुटला असल्याचं पहायला मिळालं. बारामतीकरांनीही त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्यातून त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. रूपाली पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांच्यासोबत दहा महिलांना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी