pune theft 43 lakhsआयएएस अधिकाऱ्याच्या घरात चोरी, लक्ष्मी पूजनात ठेवलेला ४३ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला

ias officers house in pune theft 43 lakhs : गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डोईफोडे यांनी आपल्या घरातील सर्व सोनं लक्ष्मीपूजनासाठी ठेवलं होतं. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत ४३  लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला आहे

ias officers house in pune theft 43 lakhs
लक्ष्मी पूजनात ठेवलेला ४३ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत ४३ लाख ५०  हजारांचा ऐवज लंपास केला
  • अज्ञात भामट्यांनी बंगल्याच्या गेटचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला
  • सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत

pune theft 43 lakhs पुणे : महसूल विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात भामट्यांनी डल्ला मारला आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यातील मुंढवा परिसरात जबरी चोरीची (Robbery in pune) घटना घडली घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जबरी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून भामट्यांचा शोध घेतला जात आहे. चोरट्यांनी मुंढवा परिसरात राहणाऱ्याच्या घरात लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले तब्बल १५० तोळे सोनं आणि अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण ४३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत ४३ लाख ५०  हजारांचा ऐवज लंपास केला

दरम्यान गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डोईफोडे यांनी आपल्या घरातील सर्व सोनं लक्ष्मीपूजनासाठी ठेवलं होतं. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत ४३  लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी आहेत. तर त्यांचे पुत्र सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे.

अज्ञात भामट्यांनी बंगल्याच्या गेटचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला

दरम्यान रात्री साडे अकरा ते पहाटे चारच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी बंगल्याच्या गेटचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आणि लक्ष्मीपूजनासमोर ठेवलेले सर्व दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने हॉलच्या खिडकीचा गज कापून आतमध्ये प्रवेश केला. घटनेच्या दिवशी डोईफोडे यांच्या घरात दोन नोकरांसह एकूण ८ जण गाढ झोपले असता चोरट्यांनी मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया,  तोडे,  ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्‍याचे सेट अशा विविध प्रकारच्या दागिन्यांने चोरून नेले. चोरीची ही घटना उघडकीस येताच डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत

संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी