Crime : पुण्यात 13 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ...शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल

पुणे
विजय तावडे
Updated Sep 22, 2022 | 18:14 IST

Pune District News : दौंड तालुक्यातील एका खेडेगावातील एका शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून त्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ग्रामीण पोलिसांकडून यासंदर्भात संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
पुणे जिल्ह्यात शिक्षकावर एफआयआर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुणे जिल्ह्यात शिक्षकावर गुन्हा दाखल
  • विद्यार्थ्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
  • दौंड तालुक्यातील एका खेडेगावातील घटना

Pune Crime News : पुणे : शिक्षकांबद्दल सर्वच समाजात आदर असतो. मात्र काहीवेळा या आदराला तडा देणाऱ्या घटना घडत असतात.  पुणे जिल्ह्यातील (Pune) दौंड तालुक्यातील एका खेडेगावातील एका शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थ्याला (Student harrasement) बेदम मारहाण करून त्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल (School teacher booked) केला आहे. हा विद्यार्थी अनुसूचित जाती जमातीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने सर्वानाच धक्का बसला आहे. (In Pune FIR is filed against school teacher for caning, hurling casteist slurs against student)

अधिक वाचा : Mumbai-Goa Highway : अंजनारी पुलावरून टँकर पलटी; चालक जागीच ठार, नदीत गॅसची गळती

शिक्षणाद्वारे सर्वत्र समता निर्माण व्हावी असे अपेक्षित असताना शिक्षकाने विद्यार्थ्याला या प्रकारची वागणूक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शाळेमध्ये ही घटना घडली. गुरुवारी सकाळी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. 

शाळेत घडली घटना

यवत पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक नारायण पवार यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की "वर्ग सुरू असताना शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पाठीवर बेदम मारहाण केल्याची तक्रार मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे. हा विद्यार्थी अनुसूचित जाती समाजातील आहे. शिक्षकाकडून जातीवाचक अपमान केल्याचा आरोपदेखील विद्यार्थ्याकडून करण्यात आला आहे. यानंतर शिक्षकावर गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे." शिक्षकावर विविध कलमे लावण्यात आली आहेत.

अधिक वाचा : Ulhasnagar : भय इथले संपत नाही..., स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू ; ओटी चौकातील मानस टाॅवर इमारतीतील घटना

शिक्षकावर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात संबंधित शिक्षकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. परंतु त्याच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.  भारतीय दंड संहितेअंतर्गत (IPC)शारीरिक हल्ला, हेतुपुरस्सर अपमान आणि गुन्हेगारी धमकी संबंधित कलमेदेखील लावण्यात आली आहेत.

अधिक वाचा :  फिट असूनही सेलेब्रिटींना का येतो हार्ट अटॅक?

शिक्षकाने या 13 वर्षाच्या मुलाला मारहाण केली आणि त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळदेखील केली, असा आरोप या विद्यार्थ्याकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी या घटनेची दखल घेत यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित शिक्षकावर एफआयआर नोंदवला आहे. गुन्हा नोंदवताना शिक्षकावर गंभीर कलमंदेखील लावण्यात आली आहे. बाल न्याय कायद आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याबरोबर इंडियन पीनल कोडअंतर्गतदेखील (IPC) कलमे लावण्यात आली आहेत. 

एरवी मुलांसाठी पालकांनंतर सर्वात जास्त आधार शिक्षकांचाच असतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. अशावेळी शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करण्याने मोठाच धक्का बसतो. विद्यार्थ्यांच्या मनावर दूरगामी परिणाम अशा घटनांनी होत असतो. अर्थात पुणे पोलिसांनी तत्परतेने या प्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी