जम्बो कोविड सेंटरमधून लेक झाली बेपत्ता, आईने सुरु केले बेमुदत उपोषण

पुणे
अजहर शेख
Updated Sep 25, 2020 | 09:43 IST

The girl went missing from the Jumbo Covid Center: माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझ्या मुलीला जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

The girl went missing from the Jumbo Covid Center
जम्बो कोविड सेंटर मधून लेक झाली बेपत्ता, आईने सुरु केले बेमुदत उपोषण   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जम्बो कोविड सेंटर समोरच आमरण उपोषण
  • प्रिया गायकवाड यांचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी वर्तवला
  • जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक

पुणे:  प्रिया गायकवाड या ३३ वर्षीय महिलेला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (corona report positive) आल्यानंतर तिला तिच्या आईने पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये (pune jumbo covid centre) दाखल केलं होते. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रिया गायकवाड (priya gaikwad) ही महिला बरी झाल्यानंतर  तिची आई सदर महिलेला घरी घेऊन जाण्यासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये आली असता, आईला तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती, अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्यानंतर आईला मात्र मोठा धक्काच बसला. दरम्यान  जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता (missing women) झालेल्या आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आता या माऊलीने  उपोषणचा मार्ग निवडला आहे. 

जम्बो कोविड सेंटर समोरच आमरण उपोषण

जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड यांचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी वर्तवला आहे. त्यामुळे रागिणी सुरेंद्र गमरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. माझी मुलगी कुठे आहे? असा सवाल रागिणी गमरे त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. रागिणी गमरे यांनी आपल्या बेपत्ता लेकीसाठी जम्बो कोविड सेंटर समोरच आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.

काय म्हणाल्या प्रिया गायकवाड यांच्या आई? 

प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी गमरे म्हणाल्या की, 'माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझ्या मुलीला जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही.' दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी माही आलो असता नेण्याची तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणतंय प्रशासन? 

दरम्यान या सदर प्रकरणाची चौकशी उपायुक्त दर्जाचे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालण्याची गरज आहे. संस्थात्मक रचनेतून गेलेल्या महिलेचा २०  दिवस तपास लागू शकत नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका स्थानिक प्रशासन आणि सरकारवर केली जात आहे.

जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक

कोटी रूपये खर्च करून आणि शासनानं ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हातवर करून मोकळ्या झाल्या आहेत. सदर महिलेला न्याय मिळायला हवा. अशा प्रकारे याठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधितावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी